क्राईम

शिरूर तालुक्यात भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू…

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे येथील शिक्षक भवनजवळ असलेल्या एका किराणा दुकानासमोर शनिवारी (ता. २९) सायंकाळी सव्वा नऊच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओ कारने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या शिक्षकाला धडक देऊन दुचाकीसह फरफटत नेले. त्यामध्ये दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.

जयसिंग बाबूराव येडलापुरे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. संतोष सुखदेव लोखंडे (वय. ४४ रा. तळेगाव ढमढेरे, मुळगाव उरळगाव ता. शिरूर, जिल्हा पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

तळेगाव ढमढेरे बाजू कडून शनिवारी संध्याकाळी स्कॉर्पिओ (एमएच १२ जे के ९९८१) भरधाव वेगाने शिक्रापूर दिशेने चालली होती. शिक्षक भवनजवळ एका किराणा दुकानासमोर कडेला उभा असलेल्या जयसिंग बाबुराव येडलापुरे यांना जोरात धडक दिली व तशीच पुढे दुचाकीलाही जोरदार धडक दिली व फरपटत नेले. यावेळी झालेल्या अपघातात संतोष सुखदेव लोखंडे हे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना तात्काळ खाजगी दवाखान्यात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

दरम्यान, स्कॉर्पिओ चालक तेजस राजेंद्र शिंदे यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिक्रापूर पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार किशोर तेलंग हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात अपघातानंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध घेत चालकाला अटक

शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार तर एक जखमी…

शिरूर तालुक्यातील वाहनाला भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर…

शिरूर तालुक्यातील युवकाचा अपघाती मृत्यू…

शिरूर तालुक्यात भरधाव कंटेनर ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू, एक जखमी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

15 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago