body
शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्या मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत.
करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्या मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांना मिळाली होती. त्यांनतर पोलिस पाटील वंदना साबळे पाटील, पोलिस हवालदार सचिन मोरे यांनी सदर ठिकाणी धाव घेत कोंडीबा साबळे, संभाजी पांगरकर, बाळासाहेब नप्ते, विशाल नप्ते, मोरेश्वर साकोरे, आप्पासाहेब वर्पे, नागू माने यांच्या मदतीने सदर मृतदेह पाण्याबाहेर काढला.
सदर मृतदेहाची ओळख पटली नसून अंदाजे ३५ ते चाळीस वर्षे वयोगटातील पुरुष असून, त्याच्या अंगात काळ्या रंगाची प्यांट असे वर्णन आढळून आले आहे. याबाबत पोलिस पाटील वंदना महेश साबळे (वय ४१ वर्षे रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहेत.
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…