शिरूर तालुका

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या वृत्तानंतर शाळा व पोलीस प्रशासन जागे

महाविद्यालयीन भाईगिरी करणाऱ्यांना चांगलीच अद्दल, शरीरावर ग्रुपचे लोगो काढण्यासह नियमांचे पालन करण्याचे आदेश

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या अल्पवयीन मुलांमध्ये गुंडगिरी, भाईगिरीचे आकर्षण वाढू लागलेले असून युवकांकडून शरीरावर ग्रुपची नावे टाकून विविध पद्धतीने भाईगिरी केली जात असल्याबाबतचे वृत्त नुकतेच “शिरुर तालुका डॉट कॉमने” प्रसिद्ध केले असताना शाळा व पोलीस प्रशासनाने पालकांसह ग्रामस्थांची बैठक घेत मुलांना आदेश देत कारवाईचे संकेत दिले आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका महाविद्यालयात अल्पवयीन युवकांमध्ये भाईगिरीची क्रेज वाढत चाललेली असताना अनेक मुळे शरीरावर ग्रुपची नावे टाकल्याचे तसेच शाळेमध्ये ग्रुपच्या नावाने संगठन केल्याचे समोर आले होते, तर नुकतेच विद्यालयात अल्पवयीन युवकाने एका युवकाच्या अंगावर ब्लेडने दुखापत केल्याची देखील घटना घडली होती. याबाबत नुकतेच वृत्त प्रसिद्ध करण्यात आले असताना शाळा व पोलीस प्रशासनाने ग्रामस्थ व पालकांची बैठक घेतली.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस नाईक रवीकिरण जाधव, सरपंच संगीता हरगुडे, उपसरपंच सागर दरेकर, माजी उपसरपंच विजयराज दरेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाबाजी गोरे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बाळासाहेब दरेकर, दगडू दरेकर, रामदास दरेकर, राजेश भुजबळ, अमोल दरेकर, बाळासाहेब मोरे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तर शाळेमध्ये केस वाढवून येणाऱ्या मुलांच्या केसांचे शाळेतच कर्तन करण्यात आले, तर शरीरावर ग्रुपच्या नावाने गोंधन असलेल्या युवकांचे गोंधन तातडीने काढण्याचे आदेश देऊन नियमांचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे दाखले देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पोलीस साध्या वेशात गस्त घालणार: अमोल खटावकर (पोलीस उपनिरीक्षक)
सणसवाडी येथील महाविद्यालयातील युवकांना शाळेचे नियम पाळून, भाईगिरी न करण्याबाबतचे आदेश दिले असून पुढील काळात सणसवाडी सह परिसरातील सर्वच शाळा व विद्यालयांच्या ठिकाणी पोलीस साध्या वेशात गस्त घालून दोषींवर कारवाई करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांनी सांगितले.

पोलिसांसह आम्ही मुलांना सूचना केल्या: बाबाजी गोरे (प्राचार्य)
सणसवाडी येथील विद्यालयात पोलिसांनी मुलांचे समुपदेशन केले आहे. दरम्यान सरपंच यांनी मुले वारंवार सांगून ऐकत नसल्याने त्यांची शाळेतच कटिंग करु, असे सांगितल्याने काही मुलांची शाळेतच कटिंग केली, तर शरीरावर असलेले गोंधन काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे प्राचार्य बाबाजी गोरे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

11 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

2 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago