love
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील करंजेनगर परिसरात महाविद्यालयीन प्रेमीयुगुलाने घरात एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर एक चिठ्ठी मिळाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
गणेश सखाराम कुडले (वय 19, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे, मूळ, रा. मांदेडे, ता. मुळशी, जि. पुणे) व अनिषा संजय चांदेकर (वय 19, रा. अंडल, ता. मावळ, जि. पुणे) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सखाराम श्रीपती कुडले (वय 19, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. मांदेडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबतची माहिती मिळताच पोलिस नाईक अतुल पखाले, विशाल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमीयुगुल मुळशी तालुक्यातील माले येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. गणेश यांचे वडिल नोकरीनिमित्त शिक्रापूर येथे स्थायिक होते. करंजेनगरमध्ये राहणारे सखाराम कुडले हे गावी गेले होते, त्यांचा मुलगा गणेश कुडले हा त्याची प्रेयसी अनिषा चांदेकर हिला घरी घेऊन आला होता.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सखाराम हे गावाकडून शिक्रापूर येथे येण्यासाठी निघाले असताना त्यांनी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला फोन करून गणेशकडे फोन देण्यास सांगितले. शेजारील व्यक्ती कुडले यांच्या घरात गेले असता यांना गणेश व त्याच्या प्रेयसीने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच पोलिस नाईक अतुल पखाले, विशाल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यांना घटनास्थळावर एक चिठ्ठी मिळून आली आहे.
दरम्यान, या चिठ्ठीत ‘आम्ही आमच्या स्वेच्छेने आत्महत्या करत असून यात आमच्या कुटुंबाचा काही संबंध नाही, आमच्यामुळे ज्यांना त्रास होत होता त्यांना त्रास होणार नाही’ असा मजकूर चिठ्ठीत लिहिला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहेत.
वाघोलीतील लॉजवर प्रेमीयुगुलाची गळफास घेत आत्महत्या…
शिरूर तालुक्यात ऑनलाइन गेममधील नैराष्यातून आत्महत्या…
शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात चुलती व पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…