क्राईम

शिरूर तालुक्यात लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार…

इंस्टाग्रामच्या ओळखीतून मैत्री, अन मैत्रीतून लग्नाचे आमिषाने बलात्कार
शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे इंस्टाग्रामच्या माध्यमातून युवतीसोबत ओळख वाढवली. पुढे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शैलेश पोपट जगताप या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे राहणाऱ्या एका युवकाने इंस्टाग्राम हून एका युवतीची ओळख निर्माण केली होती. ओळखी नंतर त्याने युवतीशी मैत्री करत युवतीला लग्नाचे आमिष दाखवले. दरम्यान, शैलेशच्या आई वडिलांशी देखील युवतीची ओळख झाली. काही दिवसांनी सदर युवकाने युवतीला मी तुझ्याशी लग्न करणारच आहे, असे म्हणून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्तापित केले.

hotel matoshree ranjangaon ganpati

काही दिवसांनी युवतीशी संपर्क तोडला. युवतीने शैलेशच्या आई वडिलांना याबाबत सांगितले असता त्यांनी तू आम्हाला काही सांगू नकोस तुझे तू बघ असे म्हटले. त्यांनतर देखील युवतीने वेळोवेळी शैलेशशी संपर्क साधला. मात्र, संपर्क झालाच नाही. त्यामुळे त्यामुळे शैलेशने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला असल्याचे लक्षात आल्याने युवतीने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी शैलेश पोपट जगताप (सध्या रा. आश्रय सोसायटी वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago