नागासोबत स्टंटचा व्हिडीओ प्रसारित झाल्याने सर्पमित्र संतप्त
शिक्रापूर: शिरुर तालुक्यात एक युवक विषारी नागाशी खेळत नागाला डिवचून जीवघेणा स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याने सर्पमित्रांनी नाराजी व्यक्त केली असून सदर युवकाचा शोध घेत कारवाई करत गुन्हे दाखल करण्याची मागणी शिरुर वनविभागाकडे केली आहे.
शिरुर तालुक्यातील एका युवकाने विषारी नागाच्या शेपटीला पकडून नागाला हाताने डवचून अक्षरशः फणा काढून बसलेल्या नागाच्या तोंडावर मारल्याचे दिसून येत आहे. सदर प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित झाला. मात्र सदर युवक शिरुर तालुक्यातील असून या युवकाच्या अंगात हाफ प्यांट असून नागाला पकडून फोनवर बोलताना दिसत आहे.
मात्र या जीवघेण्या स्टंट मुळे प्रामाणिक काम करणाऱ्या सर्पमित्रांच्या प्रतिमा मलीन होत असल्याने वनविभागाने या युवकाचा शोध घेत कारवाई करण्याची मागणी इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी निवेदनाद्वारे शिरुर वनविभागाकडे केली आहे. तर याबाबत बोलताना सदर युवकाकडे चौकशी करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचे शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…