शिरूर तालुक्यात लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार…

क्राईम

इंस्टाग्रामच्या ओळखीतून मैत्री, अन मैत्रीतून लग्नाचे आमिषाने बलात्कार
शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे इंस्टाग्रामच्या माध्यमातून युवतीसोबत ओळख वाढवली. पुढे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शैलेश पोपट जगताप या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे राहणाऱ्या एका युवकाने इंस्टाग्राम हून एका युवतीची ओळख निर्माण केली होती. ओळखी नंतर त्याने युवतीशी मैत्री करत युवतीला लग्नाचे आमिष दाखवले. दरम्यान, शैलेशच्या आई वडिलांशी देखील युवतीची ओळख झाली. काही दिवसांनी सदर युवकाने युवतीला मी तुझ्याशी लग्न करणारच आहे, असे म्हणून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्तापित केले.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

काही दिवसांनी युवतीशी संपर्क तोडला. युवतीने शैलेशच्या आई वडिलांना याबाबत सांगितले असता त्यांनी तू आम्हाला काही सांगू नकोस तुझे तू बघ असे म्हटले. त्यांनतर देखील युवतीने वेळोवेळी शैलेशशी संपर्क साधला. मात्र, संपर्क झालाच नाही. त्यामुळे त्यामुळे शैलेशने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला असल्याचे लक्षात आल्याने युवतीने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी शैलेश पोपट जगताप (सध्या रा. आश्रय सोसायटी वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहेत.

1 thought on “शिरूर तालुक्यात लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार…

  1. हा युवक तुमच्या म्हणण्यानुसार वढु येथे राहण्यास आहे
    उगाच कोरेगाव भिमा ची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका

Comments are closed.