क्राईम

न्हावरा-केडगाव रस्त्यावर टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटली; दोघांना अटक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): एका हॉटेलमध्ये कामगाराने काम करण्यासाठी आगावू रक्कम घेतली होती. पैसे घेऊनही तो काम करत नसल्याने हॉटेल चालवणाऱ्या दोघांनी मारहाण करून त्याचा खून केला होता. मृतदेह न्हावरा-केडगाव जाणाऱ्या रोडवरील पारगाव पुलाखाली भीमा नदीपात्रात फेकून दिला होता. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटण्यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, शिरूर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. ११०४/२०२३ भा.दं.वि.का.क. ३०२,२०१ प्रमाणे २९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील मयत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे गुन्हयाची उकल करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते. मयत प्रेत हे न्हावरा केडगाव जाणारे रोडवरील पारगाव पुलाखाली भीमा नदीपात्रात मिळाल्याने नक्की गुन्हा केव्हा घडला याबाबत संभ्रम निर्माण झाला. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या.

त्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. सलग आठ दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्या दरम्यान एक संशयित चारचाकी पिकअप वाहन निदर्शनास आले. सदरचे पिकअप वाहन हे टोलनाका बाजुकडे गेल्याचे आढळून आल्याने सुपा टोलनाका परीसरात चौकशी करता, मयत व्यक्ती हा टोलनाक्या जवळील हॉटेल सौंदर्या इन येथे कामास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हॉटेल सौंदर्या इन हे १) बापू भिमाजी तरटे (वय ३६ वर्ष रा. पळवे खु ॥ ता. पारनेर जि अहमदनगर), २) निलेश माणिक थोरात (वय २६ वर्षे, रा. मुंगशी, ता. पारनेर जि. अहमदनगर) यांनी चालविण्यासाठी घेतले असल्याने त्यांच्याकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे प्रथम कबुल केला आहे.

मृत व्यक्तीचे नाव संतोष आप्पासाहेब गाडेकर (रा, टोकवाडी ता मंठा जि जालना) असे असल्याचे निष्पन्न झाले. मयत संतोष गाडेकर याने हॉटेलवर काम करण्यासाठी आगाऊ रक्कम घेतलेली होती. परंतु, तो काम करत नसल्याने त्यास मारहाण करून त्याचा खून केला आणि पिकअप वाहनातून त्यास पारगाव पुलावरून भीमा नदीपात्रात त्याचे प्रेत टाकून देण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींनी मयताची विल्हेवाट लावणेसाठी वापरण्यात आलेले पिकअप वाहनासह शिरूर पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पो स्टे चे पो नि संजय जगताप, स्था.गु.शा. कडील पो.स.ई. गणेश जगदाळे, पोलिस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, अतुल डेरे, राजू मोमीण, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन करत आहे.

भीषण अपघात! शिरूर तालुक्यात एसटीच्या चाकाखाली घुसली दुचाकी…

वाघोलीतील लॉजवर प्रेमीयुगुलाची गळफास घेत आत्महत्या…

शिरूर तालुक्यात युवकाचा खून; खुनी दोन तासात पोलिसांच्या ताब्यात…

जमिनीचा बांध कोरला म्हणून पुतण्याचा केला खून…

शिरूर तालुक्यात पेट्रोल टाकून प्रेत जाळणारे गजाआड; प्रेमसंबंधातून खून…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 दिवस ago

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या…

2 दिवस ago

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर (तेजस फडके) अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे.…

2 दिवस ago

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

2 दिवस ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

3 दिवस ago

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

4 दिवस ago