shirur-accident

भीषण अपघात! शिरूर तालुक्यात एसटीच्या चाकाखाली घुसली दुचाकी…

क्राईम

कोरेगाव भीमा: पुणे-नगर महामार्गावरील वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथे एसटी बस व दुचाकी यांचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीवरील एकजण ठार तर एकजण जखमी झाला आहे. अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की दुचाकी एस टी च्या चाकाखाली घुसली आणि एसटी रस्ता दुभाजकावर शिरली. एसटीचा पुढील भाग तुटला असून, जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

वाडा पुनर्वसन येथील चौकात भीषण अपघात झाला आहे. एसटी क्रमांक एम एच ०९ ई एम ९६५२ असून शाईन दुचाकी क्रमांक एम एच १२ टी एफ ३३४० असा आहे. दुचाकीवरील एकजण मृत्यू पावला तर एकजण जखमी झाला आहे. एसटी बस ड्रायव्हर व कंडक्टर जखमी झाले आहेत. एसटी बस रस्ता दुभाजकावर गेल्यामुळे मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिक व वाहन चालक मोठ्या संख्येने येथे जमा झाले होते. जखमींना तातडीने नागरिकांनी पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृताची ओळख पटू शकलेली नाही.

याबाबत अधिकचा तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून महामार्ग अपघात पोलिस यंत्रणा संबधित ठिकाणी दाखल होत आहे.

दरम्यान, वाडा पुनर्वसन फाटा हा मृत्यूचा स्पॉट बनला असून, मोठ्या प्रमाणात युवक व नागरिकांचे प्राण जात आहेत. येथे मोठा हायमास्ट बसवण्याची मागणी सातत्याने होत आहे. पण बांधकाम विभाग व इतर शासकीय विभाग सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे आणखी अपघात होऊन नागरिकांचे प्राण जाण्याची वाट पाहत आहे काय ? असा उद्विग्न प्रश्न निर्माण होत आहे. तातडीने येथे मोठा हाय मास्ट दिवा बसवण्याची मागणी नागरिक करत आहेत.

कोरेगाव भीमा येथे विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; रस्त्यावर रक्ताचा सडा…

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

कोरेगाव भीमा येथे मध्यरात्री स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात दोन तरुण जखमी 

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू…