क्राईम

शिरूर तालुक्यात मानव विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर पुन्हा गुन्हा दाखल…

सणसवाडीत कंपनीची तक्रार करत मागितली ठेका रुपात खंडणी

शिक्रापूर (प्रतिनिधी): सणसवाडी (ता. शिरुर) येथील कंपनीला मानव विकास परिषदेचे लेटरहेड देत नंतर एचआर मॅनेजरला धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख व पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर यांच्या विरुद्ध पुन्हा खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील क्रोमवेल इंजिनिअरिंग कंपनीमध्ये सहा फेब्रुवारी रोजी मानव विकास परिषदेचे लेटर पाठवून ‘कंपनीच्या बांधकामाच्या परवानग्याची माहिती द्या, अन्यथा कंपनीच्या विरोधात आंदोलन करु’ असा इशारा दिला. त्यानंतर सदर संघटनेचा पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर याने कंपनीचे एच आर मॅनेजर प्रवीण बडदे यांना भेटून ‘कंपनीत ठेका द्या, नाहीतर महिन्याला पंधरा हजार रुपये द्या, मग मी माघार घेतो’ असे म्हणत खंडणी मागितली होती. याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल होत निलेश दरेकर याला अटक करण्यात आली.

दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी कोणाला अशा प्रकारे त्रास दिला असल्यास तक्रार देण्याचे आवाहन केले होते. क्राफ्टस्मन ऑटोमेशन लिमिटेड कंपनीमध्ये देखील मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांच्या सांगण्यावरुन पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश दरेकर याने लेटर देत माहिती मागून नंतर कंपनीचे एच आर मॅनेजर महेश खन्ना व इतरांना भेटून कंपनीत ‘दिलेले कामाचे कोटेशन मंजूर करा अन्यथा तुमची कंपनी कशी चालते हे पाहतो’ असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करुन धमकी देत ठेक्याच्या स्वरुपात खंडणी मागितली. याबाबत ईराज तिरंदास फरीदाणी (रा. खराडी पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख व जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर (रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) या दोघांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलिस नाईक अतुल पखाले हे करत आहेत.

औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याही कंपनी अथवा कंत्राटदारांना कोणी धमकावून खंडणी मागत असेल तर त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार द्यावी अथवा ९०७७१००१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले आहे.

शिरुर तालुक्यात त्या युवकाने कंपनीची तक्रार करत मागितली खंडणी अन…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

7 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago