क्राईम

शिरूर तालुक्यात किशोरवयीन मुलाला ऊसात नेऊन अनैसर्गिक अत्याचार…

शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत एक खळबळ जनक घटना घडली आहे. आई वडील लहानपणीच वारलेल्या व आजी-आजोबा सांभाळ करत असलेल्या किशोरवयीन मुलाला बळजबरीने दारू पाजत नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची अमानुष घटना घडली आहे. शिरूर तालुक्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पीडित किशोरवयीन मुलाने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून, सुरेश सुब्राव ऐवळे (रा. जातेगव खुर्द, ता.शिरूर) याला शिक्रापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

शिक्रापूर पोलिस स्टेशन येथील फिर्यादी नुसार, १७ जुलै रोजी पीडित किशोरवयीन युवक (वय १७ वर्षे १० महिने २४ दिवस) एकासोबत जातेगाव खुर्द येथील शेतात ऊस फोडण्याचे कामा करीता गेला होता. तेथे उस फोडण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर दुपारी ३.३० वाजण्याचे सुमारास बैल गाडीतून घरी येत असताना आरोपी सुरेश ऐवळे याने जबरदस्तीने पीडित किशोरवयीन युवकाला खाली उतरविले. आपल्याला दुस-या शेतात कामाला जायचे सांगून मोटार सायकलवर त्याच्या शेतामध्ये नेऊन जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर तो पीडित किशोरवयीन युवकास ऊसाचे शेतात घेवून गेला. तेथे सुरेश ऐवळे याने युवकाची पॅन्ट शर्ट काढत बळजबरी केली.

पीडित युवकाने त्याच्या पासून सुटण्याचा प्रयत्न केला असता, सुरेश ऐवळे याने किशोरवयीन युवकाच्या तोंडावर हाताने फाईट मारल्याने किशोरवयीन युवकाच्या नाकाला जखम झाली आहे. त्यानंतर सुरेश याने युवकाला पकडून ठेवुन पुन्हा झटापट करीत असताना त्याचे हाताला हिसका मारून पळून युवक पळाला. त्यावेळी किशोरवयीन युवकाला त्याचे भोसरीचे दाजी जातेगांव चौकात दिसल्यावर युवक त्यांच्या जवळ थांबलेला असताना त्यांनी युवकाला विचारले “तु का पळतो आहे?” असे विचारले असता युवकाने झालेला प्रकार सांगीतला. नंतर नराधम सुरेश ऐवळे हा मागून आला व त्याने युवकाला व त्याचे दाजी यांना शिवीगाळ दमदाटी केली.

त्यानंतर संबधित पीडित युवकाने शिकापुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. शिक्रापुर पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलता जपत संबधित युवकाला तातडीने औषधोपचार करत नराधम सुरेश ऐवळे याला पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

16 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

20 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

22 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago