क्राईम

Video: पाबळ-कान्हूर मेसाई रस्त्यावर विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू…

शिरूर (तेजस फडके): पाबळ (ता. शिरूर) येथील कान्हूर मेसाई रस्त्यावर सोमवारी (ता. १८) सकाळच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. संबंधित घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.

भास्कर शिवलाल मकवाणे (वय ६०, रा. पाबळ) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. आशा बाळू घोलप (रा. घोलपवाडी, कान्हूर मेसाई), दुचाकीस्वार सतीश भाऊसाहेब खैरे ( वय ४२ रा. खैरेनगर), मोटारचालक संभाजी भगवान जाधव (रा. भोरशेत, पाबळ) तसेच गणेश बबन आगरकर व काळूराम तुकाराम चौधरी (रा. पाबळ) असे जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाबळकडून येणारी मोटार (एमएच १२ टी के ३१६९) अचानक विरुद्ध दिशेला गेल्याने समोरून येणाऱ्या रिक्षाला (एमएच १४ ईएच २६५०) जोरदार धडक दिली. त्याचवेळी शेजारून जाणाऱ्या दुचाकीला (एमएच १२ एचएक्स ९४९६) देखील धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सुधीर सदाशिव मकवाणे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मोटारचालक संभाजी भगवान जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार संतोष शेळके करत आहेत.

दरम्यान, अपघातातील दुचाकीस्वार सतीश खैरे हे खैरेनगरचे माजी उपसरपंच आहेत. धडकेनंतर ते रस्त्याच्या कडेला जाऊन आदळले. मोटारीचे चाक त्यांच्या डोक्याजवळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून, नशीब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले.

शिरुर तालुक्यात अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; बँकेतील तरुण कॅशियरचा दुर्दैवी मृत्यू

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

न्हावरे-काष्टी अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू, पती जखमी

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिरूर! राजस्थान ढाबा पार्किंगमध्ये भीषण अपघात; ट्रक अंगावरून गेलेल्या तरुणाचा मृत्यू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

4 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

4 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

8 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

8 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

8 तास ago