क्राईम

शिरूर तालुक्यातील ऊसतोड मुकादमची फसवणूक करणाऱ्या ठकास अटक…

मंचर, (कैलास गायकवाड): पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशनमध्ये तसेच मंचर पोलिस स्टेशनमध्ये चार वर्षांपासून साखर कारखाना येथील स्थानिक मुकादम यांचे कडून पैसे उकळून त्यांना मजूर व वाहनांचा पुरवठा करतो असे खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणारा फरार असलेल्या आरोपीस पारगाव कारखाना पोलिस स्टेशन ने जेरबंद केले.

आरोपी भीमा एकनाथ पवार हा ऊसतोड मुकादम यांना ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी मजूर पुरवठा करतो, असा लेखी करारनामा करून तसेच तोंडी बोलून लेखी कारारनाम्यानुसार तक्रारदार यांच्याकडून १४ लाख ४० हजार रुपये घेऊन मजूर व वाहनांचा पुरवठा करतो, असे खोटे सांगून मजूर व वाहनांचा पुरवठा न करता यातील तक्रारदारांची फसवणूक केली होती. त्या अनुषंगाने सुरेश रखमा रोहिले व त्यांचा भाऊ नबाजी रोहिले (रा. कवठे येमई ता. शिरुर जि.पुणे) यांचे तक्रारीवरून पारगाव( कारखाना) पोलिस स्टेशन मध्ये भीमा एकनाथ पवार (वय ४९ वर्षे रा.ओढरे ता.चाळीसगाव जि. जळगाव) याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास हा प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांचे मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक लोकरे हे करीत होते. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांनी पो. उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार नरेंद्र गोराणे व पोलिस अंमलदार चंद्रकांत गव्हाणे या पथकास सदर आरोपी जेरबंद करण्यास सांगितले. सदर आरोपी यास दोन वेळेस पकडणे कामी गेले असता पथकाची चाहूल लागताच सदरचा आरोपी हा पळून जात असे.

दरम्यानच्या काळात सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पो. उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार नरेंद्र गोराणे व पोलिस अंमलदार चंद्रकांत गव्हाणे यांना पुन्हा सदर आरोपीची खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की सदरचा आरोपी हा त्याचे गावी आला आहे. त्या अनुषंगाने तात्काळ पो.सई लोकरे व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीस ओढरे (ता. चाळीसगाव) येथून ताब्यात घेऊन पारगाव कारखाना पोलिस स्टेशन मध्ये सदर गुन्हात अटक करून पोलिस कस्टडी रिमांड घेतला आहे. आरोपीने अशा प्रकारचे गुन्हे अजून केले आहेत का? याबाबत आधिक तपास केला असता आरोपीने विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे केले असलेचे दिसून आले. तसेच त्याने आणखी काही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी सदर इसमाकडून कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूनक झाली असल्यास उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे खेड विभाग, पुणे ग्रामीण यांनी संपर्क साधण्यास कळविले आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे खेड विभाग खेड पोलिस निरीक्षक उमेश तावसकर (सायबर विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे पारगाव (कारखाना) पोलिसस्टेशन,पो. उपनिरीक्षक घोडके, पो. उपनिरीक्षक लोकरे, पो.हवा नरेंद्र गोराणे, पो.हवा देवानंद किर्वे, पो. हवा शांताराम सांगडे, पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत गव्हाणे, पोलिस कॉन्स्टेबल संजय साळवे, पोलिस कॉन्स्टेबल मंगेश अभंग, पोलिस मित्र रामभाऊ वाळुंज यांनी केली.

शिरुर शहरात ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा गजाआड पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप यांची दंबंग कामगिरी

Video: शिरूर तालुक्यातील चौघांना लोणावळा पोलिसांनी केली अटक…

शिरुर येथील ‘सेंट जोसेफ’ शाळेत डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत डान्स करणे शिक्षकांना भोवले; तब्बल १७ जणांवर गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी-परीटवाटी रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू…

Video; पुणे-नगर रस्त्यावर फलके मळा येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी

मंगलदास बांदल यांच्या पत्नी आणि भावालाही ईडीने चौकशीला बोलावलं; ईडीच्या कोठडीत अजुन आठ दिवस बांदलाचा मुक्काम

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

2 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

2 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

2 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

2 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

2 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

2 तास ago