मुख्य बातम्या

शिरुर; साळवे यांच्या तक्रारीत कुठलेही तथ्य नाही, शाळेच्या बदनामीच्या कटाविरुद्ध न्यायालयात जाणार; नॅन्सी पायस

शिरुर (अरुणकुमार मोटे) गेल्या वीस वर्षांपासुन ‘सेंट जोसेफ’ हि शाळा शिरुर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असुन आम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाने शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. साळवे यांनी आमच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीत कुठलेही तथ्य नसून, आमच्या शाळेच्या बदनामीचा हा कट केला असल्याचे सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापिका नॅन्सी पायस यांनी शिरुर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

फिर्यादी सुमन साळवे, त्यांचे पती व मुलगा यांनी केलेल्या खोट्या आरोपाविरुध्द न्यायालयात दाद मागणार असुन त्यांच्या विरुध्द मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे पायस यांनी सांगीतले. तसेच याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना निवेदन दिले असुन आमच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल झाला असुन आम्ही सुद्धा याप्रकरणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

सुमन साळवे व त्यांचा मुलगा अनधिकृतपणे शाळेत आले होते. तसेच त्यांनी परवानगी न घेता व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. यात महिलांचाही व्हिडिओ ते काढत होते. त्याला मी विरोध केला त्यामुळे त्यांनी शाळेत गोंधळ घातला आणि शिक्षकांवर धावुन आले. त्याचवेळी आम्ही पोलिसांना ११२ ला कॉल करुन बोलावले होते. नंतर त्यासंदर्भात तक्रारही पोलिसात दिली होती.

 

आम्ही शाळेतील एका शिक्षकाचा वाढदिवस साजरा करीत असताना संगीत लावले होते. डीजे लावला नव्हता यावेळेस शाळेत काम करणाऱ्या शिक्षिका ही तिथे उपस्थित होत्या. त्यांच्यावर दारु पिण्याचे खोटे आरोप केल्याने त्या दुखावल्या गेल्या आहेत. साळवे यांनी अशा प्रकारचे खोटे आरोप आमच्यावर केले आहेत. जर शिक्षक दारु पिले असते. तर जेव्हा आम्ही पोलिसांना शाळेत बोलावलं तेव्हाच हि बाब पोलिसांच्या निदर्शनास आली असती.

 

तसेच त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही साळवे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर आमच्याविरुद्ध साळवे यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आम्ही सुद्धा कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे नॅन्सी पायस यांनी सांगीतले.

शिरुर येथुन अचानक आई व मुलगा बेपत्ता, पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची तक्रार दाखल; पतीचे गंभीर आरोप

शिरुर येथील सेंट जोसेफ शाळेत डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत डान्स करणे शिक्षकांना भोवले; तब्बल १७ जणांवर गुन्हा दाखल

शिरुर; लाडक्या बहिणीला भिक्षा नको, सुरक्षा हवी म्हणत महाविकास आघाडीच्या वतीने भर पाऊसात मुक आंदोलन

भिक्षा नको, सुरक्षा दया रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने बदलापुर घटनेच्या निषेधार्थ तहसीलदार म्हस्के यांना निवेदन

चिंचणी येथील वाळूमाफीयांविरोधात जोरदार कारवाई करणार; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

18 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

1 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago