शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील एका १००% दिव्यांग व्यक्तीचे घर पाडण्याच्या प्रशासनाच्या हालचालींना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. अभय जे. मंत्री यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा आदेश दिला असून, यामुळे एका गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
पिंपरखेड येथील रहिवासी तुकाराम दशरथ पवार हे पारंपरिक लोहार असून ते १००% दिव्यांग (मूकबधिर) आहेत. सरकारी जमिनीवर त्यांनी आपले छोटेसे घर बांधले आहे. मात्र, प्रशासनाकडून हे घर ‘अनधिकृत’ असल्याचे सांगून ते पाडण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. या अन्यायकारक कारवाईविरोधात पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याचिकाकर्त्याच्या बाजूने अॅड. प्रतीक्षा ठुबे आणि अॅड. रूपिका नारकर यांनी न्यायालयात प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, ग्रामीण भागातील सरकारी जमिनीवरील घरे नियमित करण्याबाबत राज्य सरकारने २० ऑगस्ट २०१८ रोजी शासन निर्णय (G.R.) निर्गमित केला आहे. याचिकाकर्ता हा अत्यंत गरीब आणि पूर्णतः दिव्यांग असल्याने त्याचे घर या नियमांतर्गत सुरक्षित राहू शकते.
दरम्यान, या प्रकरणात याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. प्रतीक्षा ठुबे आणि अॅड. रूपिका नारकर यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील पी. पी. काकडे आणि प्रियंका चव्हाण यांनी बाजू मांडली.
न्यायालयाने हे मुद्दे गांभीर्याने घेत खालील आदेश दिले:
तोडकामावर स्थगिती: पुढील आदेश येईपर्यंत याचिकाकर्त्याचे घर न पाडण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना सूचना: न्यायालयाने जिल्हाधिकारी, पुणे यांना तातडीने या आदेशाची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नोटीस जारी: न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून २०२६ रोजी निश्चित केली आहे.
महाविद्यालयीन शुल्कातील अनियमिततेची चौकशी; निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती
ग्रामपंचायतींवर जुन्या सरपंचांच्या नियुक्तीला ब्रेक; मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला स्थगिती
सर्वोच्च न्यायालय! अल्पवयीन गर्भवतीवर बाळ जन्म देण्यास जबरदस्ती करू शकत नाही
शिरूर न्यायालयाचा निकाल; अश्लील वर्तन व मारहाण प्रकरणी आरोपींना शिक्षा
शिरूर तालुक्यात डीपी चोरीचे प्रमाण वाढले; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…
View this post on Instagram