crime
शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील कल्याणी फाटा जवळ असलेल्या हॉटेल सावली बियर बार अँड परमिट रूम येथे सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. हॉटेल चालक, मालकासह व्यसनी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार अमोल अंबादास दांडगे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
प्रद्युग्न सतीश शिंदे (वय २६ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे), कुणाल विलास यादव (वय २६ वर्षे रा. यादववस्ती अष्टापूर ता. हवेली जि. पुणे), धनंजय संदीप शेलार (वय २६ वर्षे रा. मेमाणवाडी अष्टापूर ता. हवेली जि. पुणे), सागर सुनील कामठे (वय २५ वर्षे रा. धानोरे ता. शिरुर जि. पुणे), प्रणय सुखदेव यादव (वय २७ वर्षे रा. शिंदेवाडी अष्टापूर ता. हवेली जि. पुणे), संदीप गणपत शिवले (वय ३७ वर्षे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे), मुजम्मील अब्दुलकादी अली (वय ४६ वर्षे रा. सावली हॉटेल कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मुराजा ता. ढोबाका जि. हुजाई आसाम) तसेच हॉटेल मालक महेश ढेरंगे (रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे) व केदार सुरेश कोतवाल (रा. अष्टापूर ता. हवेली जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव भीमा येथील कल्याणी फाटा जवळ असलेल्या हॉटेल सावली बियर बार अँड परमिट रूम येथे वरच्या मजल्यावर बेकायदेशीरपणे मानवी जीवितास धोका असलेली हुक्का पार्टी करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली होती. त्यांनतर पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार अमोल दांडगे, रोहिदास पारखे, विकास पाटील यांनी हॉटेल सावली येथे जाऊन छापा टाकला. यावेळी काही तरुण दोन टेबलवर बसून हुक्का पार्टी करताना मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील हुक्का पाकीटे, फॉईल पेपरचा १ दरोल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. फिर्यादीवरुन हॉटेल मालकासह तरुणांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे हे करत आहेत.
मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींची मालमत्ता जप्त…
पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे ट्रकच्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू…
शिरुर पोलिसांनी गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला केले गजाआड
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…
मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…
Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…
नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…