शिरूर (अरूणकुमार मोटे): पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या युवतीला ट्रकची जोरदार धडक दिली आहे. या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
प्रियांका सोमनाथ गाडे (वय ३१, रा. सरदवाडी, शिरूर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर पळून गेला आहे. ही घटना १० ऑक्टोबर रोजी घडली आहे. याबाबत मंच्छिद्र अर्जुन टेकाळे (वय ५०, रा. कसबा, ता. बारामती, जि. पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ट्रक नंबर एम एब 16 सी डी 1767 वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी प्रियंका १० ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सरदवाडी येथे रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी ट्रक नंबर एम एच 16 सी डी 1767 वरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून रस्ता ओलांडणाऱ्या प्रियंकाला जोरदार धडक दिली. या अपघातात तिला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
शिरूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रफुल्ल भगत करीत आहेत.
सणसवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन…
निमोणे येथे अनधिकृत पुतळा बसविल्याप्रकरणी २ माजी सरपंचांसह १५ जणांवर गुन्हा दाखल
शिरुर पोलिसांनी गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला केले गजाआड
रामलिंग येथे हाय व्होल्टेजच्या तारांखाली सेंट्रींगचे काम करत असताना तारेचा शॉक बसून कामगाराचा मृत्यू