शिरुर पोलिसांनी गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला केले गजाआड

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर शहरातील बायपास पुणे-नगर रस्त्यावर एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एकाला शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल निखील भिमाजी रावडे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अविष्कार संजय सप्रे (वय १९) सध्या (रा. विठठलनगर, शिरुर, मुळ रा. सावेडी नागापुर एल.टी कॉलनी ता. अहमदनगर जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल निखील रावडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक तरुण त्याच्या पांढऱ्या रंगाच्या पोलो गाडीमध्ये गावठी पिस्टल सोबत घेवुन अहमदनगर ते पुणे जाणाऱ्या रोडच्या लगत असणाऱ्या हॉटेल गंगा ग्रॅन्ड समोर थांबला आहे. याबाबत खात्री करुन रावडे यांनी सदर माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने शिरुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस हवालदार परशराम सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल निरज पिसाळ, विजय शिंदे, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, पवन तायडे, निखील रावडे, राजु मांगडे या तपास पथकाला सुचना देऊन त्या ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

त्याप्रमाणे पोलीस पथकाने गंगा ग्रँड हॉटेल जवळ सापळा लावून त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तुल व त्याचे मॅगझिन मध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याबाबत कोणताही परवाना मिळुन आला नाही. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी,पोलीस कॉन्स्टेबल निरज पिसाळ हे करीत आहेत.

 

सदरची कार्यवाही पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलिस हवालदार परशुराम सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल निरज पिसाळ, विजय शिंदे, निखील रावडे, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, पवन तायडे, राजु मांगडे यांच्या पोलीस पथकाने केली आहे.

शिरुर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ४ अल्पवयीन मुलीं, महीला व ६ बेपत्ता मुलींचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन

शिरुर तालुक्यात नॉनव्हेज खाताय…? मग इकडे लक्ष द्याच

शिरूर तालुक्यात बनावट सोने विकणारी सक्रिय; पोलिसांचे काळजी घेण्याचे आवाहन