क्राईम

शिरूर! तुझा ट्रॅक्टर चोरला आहे, तुला काय करायचे ते कर…

शिक्रापूर: जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील साखर कारखान्यासमोर उभा केलेला ट्रॅक्टर पैशाच्या वादातून चोरून नेल्याची घटना घडली असून, या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी युवराज माणिक राठोड याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

अनिल बाजीराव पवार हे आपला एम एच १६ बि एम ४३६२ क्रमांकाचा ट्रॅक्टर कारखान्यासमोरील एका हॉटेलजवळ लावून जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी युवराज राठोड तिथे आला आणि त्याने अनिल यांच्याकडे पैशांची मागणी केली. अनिल यांनी आपले सर्व पैसे आधीच दिलेले असल्याचे त्याला सांगितले. यानंतर अनिल जेवण करून बाहेर आले असता त्यांना आपला ट्रॅक्टर जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता युवराज तिथेच रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याला ट्रॅक्टरबाबत विचारले असता, तुझा ट्रॅक्टर चोरला आहे, तुला काय करायचे ते कर, असे उद्धट उत्तर देऊन तो निघून गेला.

याप्रकरणी अनिल बाजीराव पवार (वय ३५, सध्या रा. घोलपवाडी, ता. शिरूर, मूळ रा. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी युवराज माणिक राठोड (रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ट्रॅक्टरचा शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार अजित इंगवले पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यातील त्या बहुचर्चित ड्रग्स प्रकरणातील एकूण पाच आरोपी गजाआड

शिरूर तालुक्यात ‘तुला संपवतो, स्लॅबखाली टाकून देतो’, असे म्हणत गजाने केला हल्ला…

शिरूर तालुक्यात फायनान्सच्या हप्त्यावरून युवकाच्या डोक्यात फोडली बाटली…

शिरूर तालुक्यात वाढती गुन्हेगारी चिंताजनक; ‘सिंघम’ पोलिस अधिकाऱ्याची गरज…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

12 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

12 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

12 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago