मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी! राष्ट्रवादीचा प्रभाव वाढतोय तर भाजपसमोर मोठं आव्हान…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार सध्या चांगलाच रंगात आला आहे. गावोगावी सभा, बैठका, संपर्क दौरे यामुळे संपूर्ण भागात राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण मिळाले आहे ते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे.

मांडवगण-वडगाव रासाई गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता पवार, भारतीय जनता पक्षाचे सचिन शेलार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मच्छिंद्र गदादे आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे दादापाटील फराटे यांच्यात जिल्हा परिषद सदस्य या पदासाठी थेट चौरंगी लढत आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातामुळे शिरूर तालुक्यातील मतदार भावूक झाला असून, त्याचा थेट परिणाम राजकीय समीकरणांवर होताना दिसत आहे. दादांशी असलेले भावनिक नाते, त्यांच्या कार्याची आठवण आणि त्यांनी जपलेली विचारधारा यामुळे नागरिक या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

मांडवगण फराटा भाग हा पारंपरिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. येथे स्थानिक प्रश्न, विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि रोजगार हे मुद्दे महत्त्वाचे ठरत असले तरी, यावेळी भावनिक मुद्द्यांनाही तितकेच वजन मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या भावनिक लाटेचा प्रभावीपणे प्रचारात वापर करत आहे. स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि दादांचे निकटवर्तीय मतदारांशी थेट संवाद साधत असून, “दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला संधी द्या” असा भावनिक संदेश दिला जात आहे.

दुसरीकडे, भाजपनेही प्रचारात कोणतीही कसर सोडलेली नाही. केंद्र व राज्यातील सत्तेचा दाखला देत विकासकामांचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत भाजपचा प्रचार काहीसा बचावात्मक झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. परंतु, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट भाजपसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

अजित पवारांनंतर सत्तासंतुलन ढासळलं; सुनेत्रा पवारांसमोर चार मोठी आव्हान

जिल्हा परिषद निवडणूक! टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचा ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय आढावा

शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात वृषाली वाळके, दीपक कोहकडे व स्वाती घावटे यांना वाढता प्रतिसाद…

शिरूर तालुक्यात ७ जिल्हा परिषद, १४ पंचायत समिती जागांसाठी थेट, चौरंगी व पंचरंगी लढती

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

13 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

13 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

13 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago