महाराष्ट्र

अजित पवारांच्या मृत्यूला धक्कादायक वळण! ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास केला, तिलाच युरोपमध्ये बंदी

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या प्रकरणाला धक्कादायक आणि गंभीर वळण मिळाले आहे. ज्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या विमानाने अजित पवारांनी प्रवास केला होता, त्या कंपनीची आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

युरोपियन हवाई नियामक संस्था EASA (European Union Aviation Safety Agency) ने या कंपनीवर तब्बल एक वर्षापूर्वीच बंदी घातली होती. मात्र, एवढं असतानाही हीच कंपनी भारतात आणि महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी कशी काय अधिकृत राहिली, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.

काय आहे ‘लेव्हल 1’ सुरक्षा त्रुटी?

EASA च्या अहवालानुसार, ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीला ‘लेव्हल 1’ या सर्वात गंभीर श्रेणीतील सुरक्षा त्रुटी असलेल्या कंपन्यांच्या यादीत टाकण्यात आले होते. ‘लेव्हल 1’ म्हणजे संबंधित कंपनीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस हमी नाही किंवा ती तपास यंत्रणांशी सहकार्य करत नाही, असा थेट अर्थ होतो.

याच कारणामुळे कंपनीचा ‘थर्ड कंट्री ऑपरेटर’ (TCO) परवाना निलंबित करण्यात आला होता आणि युरोपियन हवाई क्षेत्रात उड्डाणांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली होती.

२०२३ चा अपघात लपवल्याचा आरोप

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत या कंपनीच्या ‘लिअरजेट ४५’ विमानाला अपघात झाला होता. मात्र, या अपघाताबाबतची तांत्रिक माहिती देण्यास कंपनीने टाळाटाळ केली.

ऑक्टोबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत EASA ने कंपनीला तब्बल ५ वेळा स्मरणपत्रं पाठवली. तरीही कंपनीने अंतर्गत चौकशी अहवाल सादर केला नाही. परिणामी, सुरक्षा नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत युरोपियन युनियनने कंपनीवर बंदी घातली.

धक्कादायक बाब म्हणजे, या बंदीचा अधिकृत आदेश भारताच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाला (DGCA) पाठवण्यात आला होता. तरीही भारतात ही कंपनी कशी कार्यरत राहिली, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तपास आता सीआयडीकडे

गेल्या आठवड्यात बारामतीजवळ कोसळलेले विमान हे देखील याच वादग्रस्त कंपनीचे होते. या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने तपासाची सूत्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवली आहेत. दरम्यान, केंद्रीय विमान अपघात तपास संस्थेने (AAIB) विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त केला असून, त्यातील डेटावरून अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण प्रकरणावर अद्याप DGCA कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र हा मुद्दा येत्या काळात मोठा राजकीय आणि प्रशासकीय वाद निर्माण करू शकतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

5 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

5 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

5 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

20 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago