shirur-vehicle
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरांमध्ये शिरूर वाहतूक पोलिसांकडून सिटीबोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा, बीजे कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त, अल्पवयीन वाहन चालक यांच्या तब्बल ४४ वाहनांवर कारवाई करत ४०, ५०० रु. दंड आकारण्यात आला आहे.
शिरूर शहरांमध्ये विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट नंबर, नंबर प्लेटवर नाव टाकणे, ट्रिपल सीट, विना लायसन, भरधाव वेगात मोटर सायकल चालवणे, बुलेट मोटरसायकलचे फटाके वाजवणे, काचा असणाऱ्या फोर व्हीलर अशा वाहन चालकावर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे ही कारवाई अजून तीव्र करण्याकरीता पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी रोड रोमियो पथक सक्रिय केले आहे. सदरची कारवाई पोलिस हवालदार राजेंद्र वाघमोडे, पोलिस अंमलदार वीरेंद्र सुंबे, पोलिस अंमलदार आप्पासाहेब कदम, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर गोरे, पोलिस अमलदार विक्की यादव, पोलिस अमलदार विनोद काळे यांनी केली आहे.
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ‘आपल्या 18 वर्षा खालील लायसन नसलेल्या पाल्यांना मोटर सायकल चालवण्यास देऊ नये, अन्यथा वाहन मालक (पालक ) यांच्यावर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.
नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!
शिरुर तालुक्यात अजुनही पोर्शे पॅटर्न जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष; कडक उपाययोजना करण्याची गरज
पुणे आणि शिरूरचा सहा पदरी उड्डाण मार्गाला जोडला जणार समृद्धी महामार्ग; कोठून पाहा…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…