क्राईम

शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून जेरबंद केले आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिरूर तालुक्यात इन्कम टॅक्सला चार वर्षापुर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने आरोपीने दारू पिऊन महेंद्र मोतीलाल बोरा यांच्या दुकानाजवळ येवून, शिवीगाळ करून त्याच्या जर्कीगमधील एक पिस्तुल बाहेर काढून बोरा यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने पिस्तुल फिर्यादींचे छातीवर रोखून “मी तुला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देवून पिस्तुलचा खटका दाबत असताना बोरा यांनी त्याचा हात बाजूला ढकलला. तरी देखील त्याने त्याचे हातामधील पिस्तुलचे वरील बाजूने मागे पुढे ओढत असताना त्यातुन एक गोळी तेथेच खाली रोडवर पडली व बोरा यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून आरोपी कृष्णा जोशी हा तेथुन पळुन गेल्याची घटना घडली होती.

सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेवुन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला गुन्हयामधील आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेशित केले. त्याअनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी कृष्णा वैभव जोशी हा अहिल्यानगर बसस्थानकावरून जोधपुर, राजस्थान येथे जाणार आहे. त्याअनुषंगाने तांत्रिक विश्लेषन व बातमीदारांमार्फत माहिती घेवून तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांची तपास पथके अहिल्यानगर जिल्हयामध्ये रवाना झाली होती. तपास पथकांनी अहिल्यानगर बसस्थानकावर सापळा लावून आरोपी त्याठिकाणी येताच त्यास शिताफिने ताब्यात घेतले. सदरचा अतिगंभीर गुन्हा घडल्यापासुन आठ तासांचे आत आरोपीस जेरबंद करण्यात यश आले आहे.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपीकडून गुन्हयात वापरलेले गावठी बनावटीचे एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी रिमांड मंजूर केली आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलिस अमंलदार विनोद काळे, सचिन भोई, विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, निखील रावडे, अजय पाटील यांच्या पोलिस पथकाने केली आहे.

रांजणगाव गणपती येथे एकाच जमिनीची दोनदा विक्री; दिपक पंचमुख यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद…

…अन्यथा शिरुर तालक्याचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही

Video; ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या लढयाला अखेर यश शिक्रापुर पोलिसांकडुन ‘त्या ‘खुनाचा गुन्हा उघड

शिरुर; शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरी करणाऱ्याला पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

2 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

4 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

6 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

18 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

19 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

19 तास ago