क्राईम

खुनाचा प्रयत्न करून एक महीन्यापासुन फरार असलेल्या आरोपीला परजिल्हयातुन ताब्यात घेत शिरुर पोलीसांनी ठोकल्या बेडया

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत (दि. २३) डिसेंबर रोजी ८ :३० वा. च्या सुमारास शिरूर गावच्या ह‌द्दीत जुन्या नगर ते पुणे रोडवर नाझ अॅटो अॅक्सेसरिज समोर फिर्यादी आसिफ खान यांचा पुतण्या सैफ जमीर खान व हुसैन शहीद शहा यांच्यात किरकोळ वर्चस्वाचा कारणावरून तसेच (दि. १७) डिसेंबर रोजी समीर शेख यांचे आसिफ खान यांच्या भावाच्या पत्नीचे नाझ किराणा स्टोअर्स येथे केलेल्या गोंधळाचे कारणावरून आरोपी १) आयान समीर शेख याने २) हुसेन शहीद शहा दोन्ही रा. फकीर मोहल्ला, शिरूर याच्या सांगण्यावरून आसिफ खान यांचा पुतण्या सैफ जमीर खान (वय २२) रा. भाजी बाजार, शिरूर यास त्याच्या हातातील कोयत्या सारख्या धारदार हत्याराने जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यावर व हातावर वार करून त्याला गंभीर जखमी करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

सदरबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असुन त्याचा तपास शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक यांचेकडे देण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी हुसैन शहीद शहा यास (दि. २४) डिसेंबर रोजी गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली होती. आरोपी आयान समीर शेख हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता.

सदर गुन्हयाची गंभीरता लक्षात घेऊन संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक यांनी तपास पथकाला गुन्हयामधील आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले. त्याअनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी आयान समीर शेख हा तासगाव जि. सांगली येथे आहे. सदर बातमीच्या आधारे तांत्रीक विश्लेशन करून तपास पथकाचे शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार विजय शिंदे, निरज पिसाळ हे तासगाव जिल्हा सांगली येथे आरोपीताचा शोध घेणेकामी गेले असता आरोपी आयान शेख हा तेथुन फरशी बसवण्याचे कामानिमीत्त उंब्रज ता .कराड जि. सातारा येथे गेल्याबाबत माहीती मिळाली.

सांगली येथुन पुन्हा शुभम चव्हाण पोलीस उपनिरीक्षक पोलीस, अंमलदार विजय शिंदे, निरज पिसाळ हे उंब्रज येथे जावुन माहीती घेवुन उंब्रज ता .कराड, जि. सातारा येथील एस टी स्टॅन्ड जवळुन सापळा लावुन शिताफिने ताब्यात घेवून गुन्हयाचे कामी अटक करण्यात आले आहे. आरोपी आयान समीर शेख यास न्यायालयात हजर केले असता (दि २२) जानेवारीपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख साो, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पो. हवा नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, विनोद काळे, नितेश थोरात, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील यांच्या पोलीस पथकाने केली आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

12 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago