क्राईम

शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना ठोकल्या बेडया…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना बेडया ठोकल्या आहेत. एकूण सात मोटार सायकली जप्त केल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर पोलिस ठाणे हद्यीत गेल्या काही काळात झालेल्या मोटार सायकल चोरी उघडकीस आणन्याच्या दृष्टीने शिरूर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी वेगवेगळी पथके वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा शोध घेणे चाले होते. पोलिस अं. शेखर झाडबुके रात्रगस्त करत असताना शिरूर शहरामध्ये दोन जण संशईत रित्या मोटार सायकल वरती फिरत असताना मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे १) वैभव राजेंद्र बोरूडे (वय २६), २) ऋषिकेश राजेंद्र पवार (वय २३, दोघे रा. पाथर्डी ता. पाथर्डी जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले.

दोघांना शिरूर शहरात फिरण्याचे कारण व त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलची विचारपुस केली असता ते व्यवस्थित माहिती देत नसल्यामुळे त्यांना पोलिस स्टेशन येथे आणले. दोघांना विश्वासात घेवुन त्यांची कसून चौकशी केली असाता त्यांनी त्यांचे ताब्यातील मोटर सायकल हि अहमदनगर येथtन चोरी केली आहे असे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी आम्ही शिरूर शहरातुन सुध्दा गेल्या ६ ते ७ दिवसापूर्वी एक मोटर सायकल चोरी केली आहे असे तपासात सांगितले. शिरूर पोलिसांनी खात्री केली असता त्याबाबत शिरूर पोलिस स्टेशन गु. रजि. नं. ५४३ / २०२३ भा. द. वि. क ३७९ अन्वये दाखल असुन सदर गुन्हयाचे कामी त्यांना अटक केली आहे.

आरोपी १) वैभव राजेंद्र बोरूडे, २) ऋषिकेश राजेंद्र पवार यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिरूर यांचे समक्ष हजर केले असता न्यायालयाने त्यांची २५/०७/२०२३ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस कस्टडी दरम्यान सदर गुन्हयाचे अनुशंगाने अधिक तपास करता त्यांनी पुणे ग्रामीण, पुणे शहर, अहमदनगर जिल्हयामध्ये चोरी केल्याचे कबुल केले असून त्यांच्याकडून एकुण ७ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. त्यामध्ये ०२ बुलेट, १ पॅशन प्रो, ०१ सुपर स्लेंडर, ०३ स्प्लेंडर अशा मोटार सायकल किमंत अंदाजे ४,०१,००० किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस नाईक निलेश शिंदे करत आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, मितेश घट्टे, अप्पर पोलिस अधिक्षक, यशवंत गवारी उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर उपविभाग, संजय जगताप, पोलिस निरिक्षक शिरूर पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोसई एकनाथ पाटील, पो. ना. नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, निलेश शिंदे, पो. अ. विनोद काळे, रघुनाथ हाळनोर, शेखर झाडबुके, नितेश थोरात, सचिन भोई, पवन तायडे यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाई मध्ये सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

1 मि. ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago