क्राईम

स्वारगेट बलात्कार प्रकरण! दत्ता गाडे आणि युवतीच्या संबंधाबाबत वकिलांचा दावा…

पुणे: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि पीडिता यांच्यात पूर्वी कोणताही संपर्क नव्हता तसेच कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. त्यामुळे आरोपीस जामिनावर सोडल्यास पीडितेच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होईल, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसार आणि पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले यांनी न्यायालयात केला. आरोपी दत्ता गाडे यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामिनाच्या अर्जावर गुरुवारी (ता. २६) दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे.

स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे युवतीवर (वय २६) बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपीच्या वतीने न्यायालयात केलेल्या युक्तिवादात असे सांगण्यात आले की, पीडिता व आरोपी यांच्यातील संबंध परस्पर संमतीने झाले होते. कोणताही बलात्कार झाला नव्हता, तसेच आरोपीवर याआधीचे गुन्हे हे लैंगिक अत्याचारासंदर्भातील नव्हते, तर ते चोरी व दरोड्याचे होते.

मात्र, या युक्तिवादाला विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसार यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांनी तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेले आरोपपत्र आणि त्यातील महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर मांडले. यामध्ये विविध पंचनामे, तज्ज्ञांचे अहवाल, मोबाईल लोकेशन ट्रेसेस यांचा समावेश असून, हे सर्व पुरावे प्रथमदृष्ट्या आरोपीच्या guilt (गुन्हेगारी) स्वरूपावर प्रकाश टाकतात.

पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले यांनी सांगितले की, ‘आरोपीने यापूर्वीही पीडितेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असून, तो पुन्हा तसे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, पीडितेसाठी कोणतीही संरक्षण व्यवस्था न्यायालयासमोर सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपीस जामीन मंजूर करू नये, अशी जोरदार भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, पीडिता स्वतः न्यायालयात उपस्थित होती. तिने न्यायालयासमोर सांगितले की, आरोपीस जामीन मिळाल्यास तिच्या जीवास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

आरोपी दत्ता गाडे याचा पोलिसाच्या वेशातील फोटो; चौकशीत सत्य समोर येणार…

दत्ता गाडे प्रकरण! एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला?, गुणाट गावकऱ्यांचा मोठा निर्णय…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने केला मोठा दावा…

दत्ता गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम!; अहो साहेब मी तो नव्हेच…

पुणे बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे बेताल, असंस्कृत व विकृत विधान, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करा

पोलिस संजू जाधव यांचा आवाज आरोपी दत्ता गाडे याने ओळखताच मोबाईलवर फोन केला अन्….

आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक होण्यापूर्वी करायची होती आत्महत्या पण…

आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी सांगितलं…

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

शिरूर तालुक्यात घडली धक्कादायक घटना; युवक, युवतीला मारहाण करत केला सामूहिक बलात्कार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

20 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago