datta-gade-shirur

आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक होण्यापूर्वी करायची होती आत्महत्या पण…

क्राईम

पुणे: स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पोलिसांनी शुक्रवारी स्थानिकांच्या मदतीने अटक केली आहे. आरोपी दत्ता गाडे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र, दोरी तुटली त्यामुळे तो वाचला, अशी माहिती गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांची माहिती दिली आहे.

दत्तात्रय गाडे याने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण दोरी तुटली त्यामुळे तो वाचला आहे. आरोपीची प्राथिमक आरोग्य तपासणी झाली. त्याच्या गळ्यावर मार्क आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. दोरी तुटली आणि लोकांनी घटनास्थळी जाऊन त्याला वाचवल्याने त्याने आत्महत्या केली नसल्याचे बोलले जात आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेवेळी सांगितले आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या या माहितीमुळे त्याने अटक होण्याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? अशी चर्चा सुरु झाली आहे. तर त्याची आणि ज्या ठिकाणी अत्याचाराचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी तपास केला जाणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे.

आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मानेवरती दोरखंडाचे व्रण आढळून आले आहेत. पोलिसांनी अटक करण्याआधी त्याचा आत्महत्येचा प्रयत्न होता का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. त्याच्या मानेवरती दोरखंडाचे व्रण आढळल्या असल्याच्या बातमीला देखील पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील दुसरा दिला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेवेळी बोलताना सांगितले, त्याचे पहिले मेडिकल चेकअप झालेले आहे. त्यामध्ये त्याच्या मानेवरती काही व्रण आढळून आले आहेत. त्यावरून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे सांगतात. तर दोरी तुटल्यामुळे आणि तिथे लोक तातडीने पोहोचल्यामुळे तो वाचला अशा प्रकारची माहिती लोक सांगत आहेत. या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी तिथे पोलिसांना जावं लागेल. ते पडताळणी केल्यानंतर कळेल. परंतु, आता एका मेडिकलमध्ये त्याच्या गळ्यावरती व्रण दिसून येत आहेत, असे अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला होता, त्याचबरोबर श्वान पथकाच्या माध्यमातूनही दत्ता गाडे याला शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. काल साडेचार तास ही शोध मोहीम सुरू होती, पण या शोध मोहिमेला रात्री उशिरा यश आले. पोलिसांची 100 जणांची तुकडी गुणाट गावामध्ये दाखल झाली होती. हे 100 पोलीस ऊसाच्या शेतात घुसून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होते.

आरोपीचा दोन दिवस सुरू असलेला शोध अखेर संपला आहे. दोन दिवस उसात लपून बसलेला आरोपी जेवायला मिळत नसल्याने पाणी पिण्यासाठी दोन दिवस रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला आणि पोलिसांनी त्याच मागावर तपास केला. अखेर रात्री एक वाजता हा आरोपी कॅनालमध्ये झोपून असताना शोध घेणाऱ्या पोलिसांना दिसून आल्यावर त्याला तातडीने गाडीत घालून पुण्याला घेऊन आले आहेत.

आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी सांगितलं…

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा…

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…