शिरूर (तेजस फडके): पुणे शहरातील स्वारगेट बस स्टॅंडवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी गुणाट (ता. शिरूर) गावातून अटक केली आहे. आरोपीला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी व्हिडीओ शेअर करत नेमकं काय काय झालं? याचा खुलासा केला
गणेश गव्हाणे यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, ‘आरोपी दत्ता गाडे याचा गेले तीन दिवस पोलीस आणि गुणाट गावातील ग्रामस्थ शोध घेत होते. रात्री 10 वाजता आरोपीची चाहूल लागली. आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. आरोपी ताब्यात घेतला तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना कॉल केला आणि पोलीस यंत्रणा तात्काळ आली. गावातील सर्वजण पोलिसांना मदत करत होतो. पोलिसांनी प्रत्येकाची विचारपूस केली होती. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये भीतीदायक वातावरण होते. पोलिसांनी माझ्या भावाला मारलं, त्यामुळे आम्ही त्याच्या रागातून आरोपीला शोधण्याच्या प्रयत्नात होतो. गुणाट गावातील जीपीएल क्रिकेट सामने भरवले जातात, तेथील चंदनवस्ती आहे, तिथं आरोपी फिरत होता. आरोपीला मी स्वत: पाहिलं आणि तो पळत असताना मी त्याला पकडलं. त्यानंतर मी माझ्या संपर्कात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना कळवलं.’
दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला होता, त्याचबरोबर श्वान पथकाच्या माध्यमातूनही दत्ता गाडे याला शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. काल साडेचार तास ही शोध मोहीम सुरू होती, पण या शोध मोहिमेला रात्री उशिरा यश आले. पोलिसांची 100 जणांची तुकडी गुणाट गावामध्ये दाखल झाली होती. हे 100 पोलीस ऊसाच्या शेतात घुसून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होते.
आरोपीचा दोन दिवस सुरू असलेला शोध अखेर संपला आहे. दोन दिवस उसात लपून बसलेला आरोपी जेवायला मिळत नसल्याने पाणी पिण्यासाठी दोन दिवस रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला आणि पोलिसांनी त्याच मागावर तपास केला. अखेर रात्री एक वाजता हा आरोपी कॅनालमध्ये झोपून असताना शोध घेणाऱ्या पोलिसांना दिसून आल्यावर त्याला तातडीने गाडीत घालून पुण्याला घेऊन गेले.

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड
आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…
शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…
स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…
पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा…
पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…
शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…
शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…
धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…
शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार
शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…