मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती येथे पुणे-नगर महामार्गालगत धोकादायक बॅनर होल्डिंग…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या पावसाळा चालु असुन राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात यापुर्वी धोकादायक बॅनरचे होल्डिंग कोसळल्याने अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. पुण्यात RTO पुलाच्या जवळ असणारे धोकादायक होल्डिंग कोसळुन अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला. हि घटना झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. याबाबत दोषी असणाऱ्यांवर कारवाई झाली. परंतु नंतर मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ चं आहे.

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावर अनेक ठिकाणी असेच बेकायदेशीर होल्डिंग उभे केलेले असुन वर्दळीच्या ठिकाणी हे होल्डिंग असल्याने पावसामुळे किंवा वाऱ्यामुळे जर हे होल्डिंग कोसळले तर विनाकारण निष्पाप लोकांचा जीव जाण्याची शक्यता असुन या अशा अनधिकृत होल्डिंगवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेत कारवाई करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे या होल्डिंगमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे-नगर महामार्गावर अष्टविनायकापैकी एक असलेल्या रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या विरुद्ध बाजुला पुणे-नगर महामार्गालगतच रांजणगाव-सोनेसांगवी या अष्टविनायक महामार्गावर असलेल्या चौकात २ अनधिकृत होल्डिंग उभे केलेले असुन या होल्डिंगमुळे भविष्यात मोठा अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महागणपती मंदिराच्या मुख्य चौकात अनेक छोटे व्यवसाय तसेच ‘मजुर अड्डा’ असुन रोज हजारो अकुशल कामगार या चौकात कामाच्या प्रतीक्षेत उभे असतात. तसेच या चौकालगतच पुणे-नगर महामार्ग तसेच अष्टविनायक महामार्ग असल्यामुळे त्या ठिकाणी कायमच वाहणांची वर्दळ असते. त्यामुळेच या होल्डिंगमुळे भविष्यात मोठा धोका निर्माण झाला आहे. हे धोकादायक होल्डिंग या चौकातुन काढण्यात यावेत अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

रांजणगाव येथील महागणपती मंदिराच्या विरुद्ध बाजुला असलेल्या दोन होल्डिंगचा कसलाही कर रांजणगाव ग्रामपंचायतमध्ये जमा होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतचा त्या होल्डिंगशी काहीही संबंध नाही.

गंगाधर देशमुख (ग्रामविकास अधिकारी)

रांजणगाव गणपती 

(क्रमशः)

शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे छप्पराच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांकडून म्हैस लंपास

शिरूरमध्ये बेकायदेशीर खोदाई रात्रीच्या अंधारात, पाईपलाईन फुटली तरीही शिरूर नगरपरिषद गप्पा का?

तलाठ्यांच्या मनमानी कारभाराने शिरूर तालुक्यातील नागरिक त्रस्त

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago