क्राईम

शिरूर तालुक्यात चोरी करताना तीन चोरट्यांना पकडले रंगेहात अन्…

शिरूर : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सोदकवस्ती परिसरातील एका डाळिंबाच्या बागेत चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या तीन चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. शिरूर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडील दुचाकी आणि चोरीसाठी आणलेली पोती (गोणपाट) जप्त केली आहेत.

याप्रकरणी शेतकरी रोहीदास पोपट हिल्लाळ (वय ४१, रा. सोदकवस्ती, टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव संतोष उचाळे (वय २७, रा. टाकळी हाजी उचाळेवस्ती, ता. शिरूर), मिलींद प्रकाश उकांडे (वय १९, रा. केडगाव ओंकारनगर, जि. अहिल्यानगर) आणि अजित चंद्रकांत गावडे (वय २५, रा. टाकळी हाजी होणेवाडी, ता. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २६) रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रोहीदास हिल्लाळ यांच्या मालकीच्या साबळेवाडी येथील गट नंबर १०३ मधील डाळिंबाच्या बागेत हे तिन्ही आरोपी बेकायदेशीरपणे शिरले. बागेतील डाळिंबाची फळे चोरून नेण्याच्या तयारीत असतानाच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी हे चोरी करण्यासाठी हिरो स्प्लेंडर मोटार सायकल (क्रमांक MH 12 VM 8571) वरून आले होते. चोरीची डाळिंबे भरण्यासाठी त्यांनी सोबत गोणपाट (पोती) आणली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून दुचाकी आणि पोती जप्त केली आहेत.

शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस हवालदार शिंदे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे करत आहे.

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; दातच पाडले…

पुणे ते शिरूर हा प्रवास होणार केवळ ४५ मिनिटांत; पण कधी पाहा…

शिरुर तालुक्यात HDFC बँकेत बनावट सोन्याचा लाखोंचा गोल्ड लोन घोटाळा; बारा जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दुचाकी चोरीचे वाढले प्रमाण…

शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भरदिवसा मंगळसूत्र हिसकावले…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

4 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

5 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

5 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

5 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

5 तास ago

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदतीची मागणी; सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…

6 तास ago