Crime

शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भरदिवसा मंगळसूत्र हिसकावले…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात अष्टविनायक महामार्गावर भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारात सुमारे ९९ हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र लंपास करण्यात आले असून, अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीमती ज्योती भाउसाहेब सरड (वय ३८ वर्ष , व्यवसाय खानावळ, रा. काचोळेमळा, आमदाबाद, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ मे रोजी दुपारनंतर सुमारे ४:३९ वाजता फिर्यादी ज्योती सरड या त्यांच्या हिरो होंडा पॅशन प्रो (MH-12 MV-6468) दुचाकीवरून अष्टविनायक महामार्गाने संविदणे बाजूकडे जात होत्या. त्यावेळी कवठे येमाई गाव हद्दीतील काळुबाई नगर, नरवडे प्लॉट समोर त्यांच्या मागून आलेल्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना गाठले. अत्यंत चलाखीने व वेगाने त्यांच्या गळ्यातील सुमारे पाच ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र हिसकावून घेतले आणि रोडेवाडी-खडकवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाला. घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. लंपास झालेल्या दागिन्यांमध्ये दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे पॅडल (किंमत अंदाजे २७ हजार रुपये) तसेच चार ग्रॅम वजनाच्या गंठणातील ४० मणी (किंमत अंदाजे ७२ हजार रुपये) असा एकूण ९९ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

फिर्यादींच्या म्हणण्यानुसार आरोपीचे वय अंदाजे ३५ते ४० वर्षे असून त्याने काळी पँट, राखाडी रंगाचा शर्ट परिधान केला होता. त्याच्या डोक्यावर हेल्मेट होते तसेच दुचाकीच्या टाकीवर काळ्या रंगाची बॅग ठेवलेली होती. आरोपी समोर आल्यास आपण त्याला ओळखू शकतो, असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व अन्य तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, अष्टविनायक महामार्गावर दिवसाढवळ्या घडलेल्या या मंगळसूत्र चोरीच्या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी महामार्गावरील गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिरूर पोलिसांचा मानवतेचा चेहरा! शेतकरी महिलेसाठी नाथा जगताप ठरले ‘देवदूत’

नशेचा नवा ट्रेंड! शिरूर तालुक्यात पाईप चिकटविण्याच्या लिक्विडचा नशेसाठी वापर…

शिरूरमध्ये ‘सोन्याच्या मोडी’च्या नावाखाली तब्बल १ कोटींची फसवणूक…

Video: शिरूर तालुक्यात अवैध हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत…

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी; लाखो रुपयांचे दागिने लंपास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत