मुख्य बातम्या

पुणे ते शिरूर हा प्रवास होणार केवळ ४५ मिनिटांत; पण कधी पाहा…

पुणे : पुणे-शिरूर महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उन्नत महामार्गाच्या उभारणीस गती मिळाली असून, हा देशातील सर्वांत लांब उन्नत महामार्ग ठरणार आहे. या महामार्गाची लांबी ३५.१२ किलोमीटर असेल. याचबरोबर पुणे-शिरूर महामार्गाचे रुंदीकरण करून तो सहापदरी केला जाणार आहे. यामुळे पुणे ते शिरूर हा प्रवास केवळ ४५ मिनिटांत होणार आहे.

पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाच्या कामास राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मंजुरी दिली होती. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प राज्य सरकारकडे हस्तांतरित केला होता. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळावर सोपविली. या कामाची निविदा वेलस्पन कंपनीला मिळाली असून, आता महामंडळाकडून कंपनीला या प्रकल्पाचा कार्यादेश देण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ७ हजार ३०० कोटी रुपये आहे. हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्वावर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याची मुदत आहे.

पुणे ते शिरूर महामार्गावरील हा प्रकल्प एकूण ५३.४ किलोमीटर लांबीचा असेल. त्यात ३५.१२ किलोमीटरचा उन्नत सहापदरी मार्ग असेल. याचबरोबर सध्या असलेल्या महामार्ग अद्ययावत करून तो सहापदरी करण्यात येईल आणि त्याची लांबी १८.२ किलोमीटर असेल. हा मार्ग खराडी येथून सुरू होऊन शिरूरमध्ये संपेल. नियोजित रामवाडी ते वाघोली हा मेट्रो मार्ग याच महामार्गावरून जाणार आहे. त्यामुळे तिथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा पूल ११.६ किलोमीटरचा असेल. त्यात पहिल्या पातळीवर सहापदरी रस्ता आणि दुसऱ्या पातळीवर मेट्रो मार्गिका असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे ते शिरूरदरम्यान उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय जागेच्या अभावी घेण्यात आला आहे. पुणे ते शिरूर हा औद्योगिक पट्टा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे. या मार्गावर निवासी आणि व्यावसायिक इमारतींची संख्या जास्त आहे. त्यामुळे भूसंपादन करून विस्तारित मार्ग उभारणे अव्यवहार्य होते. त्यातूनच सध्या असलेल्या महामार्गावरच उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव समोर आला. सध्या ८० टक्के जागा या प्रकल्पासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा प्रश्न निर्माण झाला नाही, असे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

पुणे ते शिरूरदरम्यान सध्याची वाहतूक कोंडीची स्थिती अतिशय बिकट आहे. यातून मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे आता पुणे ते शिरूर हा सहापदरी उन्नत महामार्ग तयार केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच, पुण्यातून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. यामुळे मराठवाड्याशी अधिक वेगवान जोडणी होणार आहे. लवकरच हे काम सुरू होणार असून, हा देशातील सर्वांत मोठा सहापदरी उन्नत महामार्ग ठरेल, असे ब्रिजेश दीक्षित यांनी नमूद केले.

पुणे-शिरूर प्रकल्पाची वैशिष्टे…
एकूण लांबी ५३.४ किलोमीटर
उन्नत मार्ग ३५.१२ किलोमीटर
सध्याच्या महामार्गाचे रुंदीकरण १८.२ किलोमीटर
बांधकामाचा कालावधी ४ वर्षे;
एकूण खर्च ७ हजार ३०० कोटी रुपये

पुणे ते शिरूर सहापदरी महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला होणार सुरूवात…

पुणे ते छ. संभाजीनगर महामार्गाच्या प्रकल्पाच्या कामाला अखेर वेग; खराडी ते शिरूर…

पुणे-शिरूर सहापदरी कॉरिडोर प्रकल्पाबाबत मोठी माहिती…

पुणे-शिरूर महामार्ग खरंच होणार कोंडीमुक्त; तीन मजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून…

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

56 मिनिटे ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

1 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

19 तास ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

19 तास ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

19 तास ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

19 तास ago