Shirur Police Station
शिरूरः शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील पुण्याई मंगल कार्यालयामध्ये आज (मंगळवार) दुपारी ४च्या दरम्यान लग्नसमारंभात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात शिरूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले आहेत.
ऋषीकेश नितीन जाधव (वय 23, रा.नानगाव,ता.दौंड,जि.पुणे) यांनी संदीप दत्तात्रय शेलार, हर्षद बाळासो खळदकर व विशाल केशव खळदकर (सर्वजण रा.नानगाव, ता.दौंड,जि.पुणे) यांच्याविरुद्ध मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखला केली आहे. फिर्यादी ऋषीकेश जाधव यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी आमच्याकडे रागाने पाहतोस आणि कृष्णा लोंढे यांच्या घरी मदत करतो म्हणून रॉडने डोक्यात वार केला तसेच लाथाबुक्यांनी जबरी मारहाण करून शिवीगाळ केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरूर तालुक्यातील मान्यवरांच्या अनुभवावर ‘शिरूरचे झिरो टू हिरो’ पुस्तक!
दुसरी फिर्याद साक्षी संदीप शेलार (वय 22,रा.नानगाव,ता.दौंड, जि.पुणे) यांनी दाखल केली असून, साक्षी शेलार यांनी ऋषीकेश नितीन जाधव यांच्यासह संदीप उर्फ गुलाब पोपट खळदकर, विक्रांत उर्फ विकास पोपट खळदकर, महेश बापुराव इंगळे, अभिजित संजय खळदकर, शिवाजी चंद्रकांत खळदकर, निखील मच्छिंद्र निगडे, शेखर गोविंद खळदकर, सुशांत वसंत खळदकर, अनिकेत शंकर इंगळे (सर्व रा.नानगाव ता.दौंड जि.पुणे) इत्यादी दहा जणांविरुद्ध विनयभंग, मारहाण, शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करून फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी साक्षी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे पती संदीप शेलार याने केडगाव पोलिस चौकीत तक्रार दिल्याच्या रागातून संबंधित नऊ आरोपींनी लग्नामध्येच फिर्यादीचा पती संदीप शेलार व फिर्यादी साक्षी शेलार यांच्यावर अचानक हल्ला केला. यामध्ये साक्षी शेलार यांचा विनयभंग केला असून, पती संदीप शेलार यांना दगडाने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, लग्नामध्ये झालेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील एका लग्न समारंभात जुन्या वादातून दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस करीत आहेत.
शिरुर महसुलच्या अजब अधिकाऱ्यांचा गजब कारभार; आधी पंचनामा नंतर अज्ञात माती चोरांविरोधात फिर्याद…?
शिरूर तालुक्यातील ३७ शाळांचा शंभर टक्के दहावी निकाल; एकूण निकाल ९७.२९%
शिरूर तालुक्यात घर बंद असताना घरफोडी, तब्बल पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास
सणसवाडीची भाजी मंडई ठरतेय मृत्यूचा दुहेरी सापळा!
सविंदणे येथील चार जवानांची निवृत्ती, गावाने केला अनोखा सन्मान
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…