शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मृत बाळासाहेब तांबे हे वरुडे येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करत होते. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनेमुळे वरुडे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तांबे यांच्या कुटुंबातील सदस्य सोमवारी पहाटेच्या सुमारास बाहेर आले असता, त्यांना बाळासाहेब रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले आणि एकच आक्रोश केला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. कष्टाळू शेतकऱ्याचा अशा प्रकारे झोपेतच खून झाल्यामुळे संपूर्ण वरुडे गावावर शोककळा पसरली असून, गावकऱ्यांनी या घटनेबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने वरुडे गावात दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब तांबे यांचा कोणाशी कौटुंबिक वाद, जमिनीचा वाद किंवा जुने वैमनस्य होते का? या अंगाने पोलीस तपास करत आहेत.
शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा (कलम 302अन्वये) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली आहेत. अंगणात झोपलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे गळा चिरून खून झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, परिसरात कमालीची भीती पसरली आहे.
View this post on Instagram
वरुडेत बकरे चारण्याच्या वादातून मेंढपाळांना मारहाण
Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…
शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…
शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; दातच पाडले…
शिरूरमध्ये ‘सोन्याच्या मोडी’च्या नावाखाली तब्बल १ कोटींची फसवणूक…