वरुडेत बकरे चारण्याच्या वादातून मेंढपाळांना मारहाण

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): वरुडे (ता. शिरुर) येथे शेतात बकरे चारण्यातून झालेल्या वादातून मेंढपाळ मायलेकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मल्हारी बापू मलगुंडे, बबन बापू मलगुंडे, मारुती बापू मलगुंडे, बबन बापू मलगुंडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वरुडे (ता. शिरुर) येथील राहुल मुळे यांच्या शेतात चांगुणा लकडे या त्यांच्या पती व मुलासह बकरे चारित असताना त्यांचा मल्हारी मलगुंडे यांच्या सोबत वाद झाला, दरम्यान मल्हारी याने फोन करुन त्याच्या भावंडांना बोलावून गघेतले त्यांनतर मल्हारी व आदींनी चांगुणा लकडे त्यांचे पती कोंडीबा लकडे व मुलगा सुनील लकडे यांना शिवीगाळ, दमदाटी करत काठीने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत चांगुणा कोंडीबा लकडे (वय ३७) रा. वरुडे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मल्हारी बापू मलगुंडे, बबन बापू मलगुंडे, मारुती बापू मलगुंडे, बबन बापू मलगुंडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार राजेश माने करत आहे.