क्राईम

शिक्रापूरमध्ये भरदिवसा दोन लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी

शिक्रापूर: शिक्रापूरमध्ये भरदिवसा दोन लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कळमकर वस्ती येथे शिवगंगा कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे भारत टेकाडे व अर्चना टेकाडे दोघे रविवारी दुपारच्या सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेलेले होते. सायंकाळच्या दरम्यान दोघे पुन्हा घरी आले असताना त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले व कडी उघडी दिसली म्हणून त्यांनी घरात जाऊन पाहणी केली तेव्हा सर्व साहित्य अस्ताव्यस्थ आणि कपाट उघडे असल्याचे दिसले. त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील चार तोळे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोख रक्कम असा अंदाजे दोन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले.

याबाबत भारत नारायण टेकाडे (वय २९ वर्षे रा. कळमकरवस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बेराळा ता. चिखली जि. बुलढाणा) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे व पोलिस नाईक रोहिदास पारखे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago