तारळे: किरकोळ कारणावरून घरात वादावादी करणाऱ्या व्यक्तीला कुटुंबातीलच सदस्यांनी संगनमताने जबर मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सवारवाडी (कडवे बुद्रुक, ता. पाटण) येथे घडली. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात पत्नी, मुलगा, मुलगी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने तारळे विभाग हादरला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, डोंगरावर वसलेल्या सवारवाडीतील ही घटना शनिवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजता घडल्याची माहिती आहे. मृत व्यक्ती नेहमीच शिवीगाळ करून घरच्यांशी भांडण करायचा. मद्यपान करून त्रास द्यायचा, आवडीची भाजीच केली नाही, अशा किरकोळ कारणांवरून पत्नी व मुलीस मारहाण करत होता. यातूनच ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
याप्रकरणी मृताचा मुलगा हरीश खरात (वय २२), पत्नी लक्ष्मी खरात (वय ४२, रा. कडवे बुद्रुक) यांच्यासह मुलगी अश्विनी उमेश शिंदे (वय २४, रा. नागठाणे, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी, रमेश खरात हा व्यसनी होता. तो किरकोळ कारणावरून नेहमी वादावादी करून घरच्यांना शिवीगाळ करून भांडायचा, असा जबाब दिला आहे.
शुक्रवारी (ता. २५) रात्री आवडीची भाजी केली नाही, या किरकोळ कारणावरून पत्नी लक्ष्मी रात व मुलगी अश्विनी शिंदे यांना त्याने मारहाण केली होती. या अशा रोजच्या त्रासाला कंटाळून या तिघांनी संगनमत करून लाकडी दांडक्याने व हाताने रमेश खरात याच्या हातापायावर व इतरत्रही जबर मारहाण केली.
या मारहाणीमुळे गंभीर जखमी झाल्याने तो घरातच बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला कोणत्याही वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले नव्हते. त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी फिर्याद पोलिस हवालदार राजकुमार कोळी यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून तिघांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ३ (५) प्रमाणे सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…