क्राईम

धक्कादायक! शालेय विद्यार्थ्यांना ड्रग विकल्याचा प्रकार, महिलेस अटक…

मुंबई: शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच प्रकरणी मुंबईतील बोरिवली एमएचबी पोलिसांकडून गुरुवार (दि. 22) रोजी दुपारी एका 52 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेकडून 250 ग्राम वजनाच्या गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या आल्या असून त्याची अंदाजे किंमत 2000 रुपये इतकी आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – गुरुवारी दहिसर भागातील एका उद्यानात शालेय गणवेशात काही मुले धूम्रपान करत असल्याचे शिवसैनिकास आढळून आले होती.

यानंतर ही बाब त्याने शाखाप्रमुख भूपेंद्र कवळी यांना फोनद्वारे कळवली. यानंतर शाखाप्रमुखाने सदर ठिकाणी जाऊन त्या मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापैकी तीन मुले पळून जाण्यात यशस्वी झाली. मुले पळाल्यामुळे काहीतरी गैरप्रकार होत असल्याचं ध्यानात येताच कवळी यांनी त्या मुलाला नाव आणि शाळेचे नाव विचारुन माहिती घेतली आणि ही बाब पोलिसांना कळवली.

यानंतर एमएचबी पोलिसांनी गणपत पाटील नगर गल्ली नंबर 1 मधून एका ड्रग विकणारी 52 वर्षीय मुस्लिम महिलेला काल दुपारी अटक केली आहे. अटक करण्यात आलेली आरोपी महिला गेल्या काही वर्षांपासून शाळेच्या आणि कॉलेजच्या मुलांना ड्रग विक्री करण्याचं काम करत होती. पालकांमध्ये भितीचे वातावरण – दरम्यान ड्रग विकणारी महिलेला अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकारानंतर बोरिवली आणि दहिसर पश्चिमच्या परिसरामध्ये शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या महिलेची एमएचबी पोलीस कसून चौकशी करत आहेत. हेही अपरहणकर्त्याने स्वतःच मुलीला मध्यरात्री घरी आणून सोडलं अन् तिथेच गेला आरोपीचा जीव, अमरावतीत काय घडलं?शिवसेनेची मागणी – या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे बोरिवली आणि दहिसर पश्चिम परिसरामध्ये मोठ्या संख्येत ड्रग पॅडलर आहेत, हे ड्रग पेडलर शाळांच्या मुलांना ड्रगचा विळख्यामध्ये घालत आहेत. त्यामुळे अशा सर्व ड्रग पॅडलरवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख भुपेंद्र कळवी यांनी पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्याकडे केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

18 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago