क्राईम

सणसवाडीच्या मंदिरातून चांदीच्या पादुका व त्रिशुल चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला असलेल्या भैरवनाथ मंदिरातील देवाच्या चांदीच्या पादुका व त्रिशुल चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मंदिराचे पुजारी बाळासाहेब गाडे हे सकाळच्या सुमारास मंदिरात नित्यपूजा करण्यासाठी आले असता त्यांना मंदिरातील नित्य पूजेच्या जागेवर देवासमोर असलेल्या चांदीच्या पादूका व त्रिशुल दिसले नाही. त्यांनी लगेचच गावातील सुरेश हरगुडे यांना फोन करुन माहिती दिली असता सुरेश हरगुडे व गोरक्ष भुजबळ यांनी मंदिरात धाव घेत पाहणी केली असता मंदिरातील पादुका व त्रिशुल चोरीला गेल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, पोलीस हवालदार आत्माराम तळोले, पोलीस शिपाई लखन शिरसकर, किशोर शिवणकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता एक व्यक्ती मंदिरात येऊन पादुका व त्रिशुल बॅगमध्ये घेऊन जात असल्याचे CCTV मध्ये दिसून आले तर घडलेल्या घटनेबाबत सुरेश सोनबा हरगुडे (वय ४३) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुन्ना मुत्तनवार हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

8 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

8 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

8 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

8 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

8 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

8 तास ago