शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथून आपल्या आईसह दुचाकीहून जाणाऱ्या मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीहून आलेल्या अज्ञात युवकांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पार्लर व्यावसायिक हेमलता सपकाळे हि महिला सायंकाळचे सुमारास त्यांची मुलगी ख़ुशी हिला दुचाकीहून शिक्रापूर येथून वढू बुद्रुक येथे घरी चाललेली असताना पाठीमागून दोन युवक दुचाकीहून आले. त्यांनी सपकाळे यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या ख़ुशी हिच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली त्यांनतर दोघे युवक पुणे बाजूकडे भरधाव वेगाने निघून गेले.
याबाबत हेमलता युगेश सपकाळे (वय ४६) रा. शंभू नगरी सोसायटी वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई नीरज पिसाळ हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…