क्राईम

कांद्याच्या आरणीवरून वाद विकोपाला; एका शेतकऱ्यावर सात जणांचा हल्ला

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीमध्ये शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शेजारील सात जणांनी हल्ला केल्याची गंभीर घटना 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.45 वाजता घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु. र. नं. 259/2025 अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बाबुराव सगाजी इचके (वय 46), व्यवसाय – शेती, रा. कवठे येमाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या गट नं. 291 या मालकीच्या जमिनीत पत्नी अनिता, मुलगी धनश्री, चुलत भाऊ सोमनाथ इचके आणि काही नातेवाईकांसह कांद्याच्या आरणीचे (चाळीचे) बांधकाम करत असताना ही घटना घडली.यावेळी त्यांचे शेजारी आशा बबन इचके,राजेंद्र बाळकृष्ण इचके,सुरेखा राजेंद्र इचके,यश राजेंद्र इचके, मंगल बाळकृष्ण इचके, रूपाली संतोष इचके ,संतोष बाळकृष्ण इचके (सर्व रा. इचकेवाडी, कवठे येमाई) – यांनी जमाव जमवून “ही जमीन आमची आहे, येथे आरण बांधू नका” असे म्हणत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास पो.ह.वा. बनकर हे करीत आहेत.या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत कलम 115 (2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप अटकेत नाहीत, मात्र पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

शेतीच्या मालकीवरून वाद हा काही नवा विषय नाही, पण यामुळे हिंसाचाराला सामोरे जावे लागणे ही चिंतेची बाब आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

13 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

13 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

14 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

19 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

19 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

19 तास ago