body
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील महाबळेश्वर नगर परिसरात (दि.14) रोजी सकाळच्या सुमारास नदीच्या पाण्यामध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याचे काही नागरिकांना दिसले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस नाईक संतोष मारकड, रविकिरण जाधव, महेंद्र पाटील यांनी घटना स्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
यावेळी महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५, अंगात राखाडी रंगाचा ब्लाऊज, हिरव्या रंगाचा परकर, कानात व गळ्यात पिवळ्या धातूचे दागिने असे आढळून पोलिसांनी सदर महिलेबाबत आजूबाजूला चौकशी केली असता काहीही माहिती मिळू शकली नाही.
याबाबत कैलास विश्वास मराठे (वय ५७) रा. पाबळ चौक शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर पुढील तपास पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…