क्राईम

पुणे हादरले! दृश्यम चित्रपट पाहून नातवाने केले आजीच्या शरीराचे तुकडे

पुणे: माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. मुलानेचं नातवाच्या मदतीने (दि. 6)सप्टेंबर रोजी स्वतःच्या आईचा खुन केला आहे. दृश्यम चित्रपट पाहून नातवाने आजीचे कटरने 9 तुकडे केले. बापानेचं आपल्या मुलाला स्वतःच्या आईचा खून करण्यासाठी प्रोत्साहित केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विशेष म्हणजे आरोपी संदीप गायकवाड हा रिपब्लिकन पक्ष ऑफ मातंग आघाडीचा शहराध्यक्ष आहे. दोन्ही आरोपींना (दि. 7) सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुलाने नातवाच्या मदतीने आईच्या शरीराचे केले 9 तुकडे कसा घडला प्रकार? मृत महिला देहूरोड येथे आर्मी कॅम्पमध्ये कामास होती. पण रिटायरमेंट नंतर ती केशवनगर येथे राहायला आली. सुन आणि सासूत बाचाबाची व्हायची. मृत महिलेच्या नावावरील घर, दागिने यावर नजर ठेवून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

घरात आजी उषा गायकवाड आणि आरोपी नातू साहील ऊर्फ गुडडु गायकवाड हे दोघेच होते. दुपारी 3 वाजल्याच्या दरम्यान त्याची आजी उषा गायकवाड (वय ६२) या घरात झोपले असताना आजीचे कटरने 9 तुकडे केले असून दृश्यम चित्रपट पाहून नातवाने आजीचे कटरने केले 9 तुकडे आजी उषा गायकवाड हिस बाथरुममधे ओढत नेवुन तीच्या शरीराचे इलेक्ट्रिक कटर मशिनने 9 तुकडे केले. एका पिशवीत काही तुकडे भरुन तो वापरत असलेल्या वेस्पा दुचाकी गाडी व चारचाकी स्वीफ्ट गाडीमधे भरुन प्रथम केशवगर येथील जॅकवेल कचराडेपोच्या मागील बाजुच्या मुळा मुठा नदीपात्रावरील नदीत टाकले. बाकीचे 3 पोते तुकडे थेऊर येथील नदीच्या पुलावरुन वाहत्या पाण्यात टाकले होते.

मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी साहिल हा ग्राफिक डिझायनर असून तो मोठ्या प्रमाणात युट्युब वर क्राईम संदर्भात व्हिडिओ बघत असेल. तसेच अनेक वेळा त्याने दृश्यम हा चित्रपट देखील पाहिला आहे. तसेच तो क्राइम पेट्रोल देखील पाहत होता. आणि हे पाहूनच त्याने आपल्या स्वतःच्या आजीचे 9 तुकडे करुन विल्हेवाट लावली आहे. आरोपींना 7 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२)…

22 तास ago

Video; न्हावरे येथील घोडगंगा कारखान्याच्या भंगाराला आग; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे वेळीच आग आटोक्यात

शिंदोडी (तेजस फडके) न्हावरे (ता. शिरुर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील भंगारात…

22 तास ago

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

2 दिवस ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

2 दिवस ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

4 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

4 दिवस ago