मुंबई: एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तो त्रास शरद पवार साहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.
जयंत पाटील यांनी भाजप आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती असून त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रियाताई सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. बारामतीत सुर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु बारामती पवारसाहेबांना सोडणार नाही एवढं ते घट्ट नातं आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
बारामतीत उमेदवार कोण द्यायचा हे भाजप ठरवेल. बारामती सध्या भाजपने टार्गेट केली आहे. शिवाय आमच्याकडेही टार्गेट केले आहे, असं वातावरण तयार करायचं की आम्ही सर्वात मोठ्या लोकांना टार्गेट करतोय, अशी भाजपची मिडियासमोर जाण्याच्या पध्दती आहेत. मात्र थोड्या दिवसात आमचाही प्लॅन मांडेन. त्यावेळी कुणाकुणाला टार्गेट करतोय हे तुमच्याही लक्षात येईल, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
सत्ता आहे तर सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून अशा तयारीला लागले आहेत. याचा अर्थ भाजपला आपली लोकप्रियता कमी व्हायला लागलीय हे लक्षात यायला लागले आहे आणि जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशा गोष्टी भाजप करते असा जोरदार हल्ला बोलही जयंत पाटील यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारले होते. ते का नाकारले याची चर्चा करु इच्छित नाही. परंतु बावनकुळे यांनी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर अशा पध्दतीने बोलणं त्यांना शोभत नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…