क्राईम

वाजेवाडीत घराचा दरवाजा उचकटून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी ता. शिरुर) येथील एका घरातील व्यक्ती बाहेर गेलेले असताना अज्ञात व्यक्तीने बंद घराचा दरवाजा उचकटून घरातील रोख रक्कम तसेच काही डायऱ्या चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वाजेवाडी (ता. शिरुर) येथील मयूर लोखंडे यांची आई व बहिण काही कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून दुपारच्या सुमारास बाहेर गेलेले होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास लोखंडे यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा उचकटला असल्याचे शेजारील नागरिकांना दिसले. त्यांनी याबाबत मयूर यांना माहिती दिली असता मयूर यांनी घरी येत पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचा मागील दरवाजा उचकटून घरातील कपाटात ठेवलेले चोवीस हजार रुपये तसेच काही डायऱ्या चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

याबाबत मयूर अरुण लोखंडे रा. वाजेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

3 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago