crime
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठन फाटा येथील म्यूचल कंपनी समोर राहणारे श्रीनिवास बुरसे हे २९ डिसेंबर रोजी बाहेरगावी गेलेले असताना त्यांनी घराला तसेच गेटच्या दरवाजाला कुलूप लावलेले होते. १ जानेवारी रोजी बुरसे हे पुन्हा घरी आले असताना त्यांना गेट व दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता कपाट उघडे असल्याचे आणि घरातील साहित्य अस्थाव्यस्थ पडलेले असल्याचे दिसून आले.
दरम्यान कपाटाची पाहणी केली असता कपाटातील तीन तोळे सोन्याचे तसेच चांदीचे काही दागिने असा सव्वा लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आल्याने याबाबत श्रीनिवास मनोजकुमार बुरसे (वय २८) रा. मलठण फाटा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…