Crime
शिक्रापूर: गोलेगाव (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथील शेतकरी सुखदेव गायकवाड यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर पाण्यासाठी पाण्यातील विद्युत मोटार बसवलेली होती, एक जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गायकवाड शेतात पाणी देऊन घरी आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीमध्ये, मोटार बांधलेली दोरी मोकळी असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता कोणीतरी मोटारची दोरी व पाईप कापून विहिरीतील मोटार चोरी केल्याचे गायकवाड यांच्या निदर्शनास आले.
याबाबत सुखदेव हरिभाऊ गायकवाड (वय ४५) रा. गोळेगाव गायकवाड वस्ती (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्रीनाथ जगताप हे करत आहे.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…