शिरूर तालुका

धक्कादायक…! पोलीस ठाण्यातच मनोरुग्णाचा हाय व्होल्टेज ड्रामा

शिक्रापूर: शिरुर तालुक्यात पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या घटना घडत असताना मागील आठवड्यात शिरुर पोलीस स्टेशन मधून एका आरोपीने पलायन केलेले असताना आता शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये एका मनोरुग्ण युवकाने हाय व्होल्टेज ड्रामा केल्याने खळबळ उडाली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांचे कर्त्यव्य बजावत असताना दुपारच्या सुमारास सणसवाडी येथील एका कंपनीतील युवकाने एका मनोरुग्ण युवकाला संशयित म्हणून पकडून आणले. दरम्यान पोलिसांनी त्या युवकाकडे चौकशी केली असता तो दारुच्या नशेत तसेच मनोरुग्ण असल्याचे समोर आले.

unique international school

यावेळी पोलिसांनी त्याला शांत करण्यासाठी काही वेळ सावलीमध्ये बसवले. मात्र अचानकपणे सदर युवक बडबड करत येथील झाडावर चढला. यावेळी पोलीस देखील गोंधळून गेले काही पोलिसांनी त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केले. काही वेळाने सदर युवक झाडावरुन खाली उतरल्याने अनर्थ टळला तर पोलिसांनी याबाबत पोलीस स्टेशन येथे नोंद करत त्याला घरी पाठवले. मात्र याबाबत बोलताना सदर युवक वेडसर असल्याने त्याच्यावर कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल केला नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

8 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

9 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

10 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

10 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

10 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

10 तास ago