शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथील घरफोडी, कृषी पंप चोरी, केबल चोरी तसेच कृषीची दुकाने फुटलेली असून या गुन्ह्यांचा तपास लागत नाही तोच आता टेमकर वस्ती येथील शेतकऱ्याच्या वखारीतून कांद्याची चोरी झाल्याने शेतकरी वर्गात असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.
टेमकर वस्तीतील म्हसेफाटा येथे चारीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरेश लोखंडे यांच्या वखारीतून रात्रीचे चोरट्यांनी कांदे चोरुन नेले आहेत. यापूर्वी शेतातून कांदे काढून नेणे, भरलेल्या पिशव्या उचलून नेणे, डाळिंबाच्या बागेतून डाळिंब तोडून नेणे असे प्रकार घडलेले आहेत. परंतु वखारीतून मोकळे कांदे भरुन नेल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
आधीच अवकाळी पाऊस, पिकांचे झालेले नुकसान, शेतमालाचे बाजार भाव, बिबट्यांची दहशत या समस्यांनी हैराण झालेला शेतकरी जय किसान चा नारा देत उभारी घेत असतानाच त्यांच्या कष्टावरच डल्ला मारला जात असल्याने हताश झाल्याचे दिसून येत आहे.
बेट भागातील घरफोडी, कृषी पंप चोरी, केबल चोरी, शेतमाल चोरी अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून या चोरांना आळा कधी बसणार? जोपर्यंत यातील गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत हे सत्र असेच सुरु राहणार का? असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…