शिरूर तालुका

व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन गरजेचे; रामदास थिटे

शिक्रापूर (शेरखान शेख): पंधरा ऑक्टोंबर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो. मात्र चौफेर वाचनाने रोज नवा विचार, कल्पना किंवा जीवन बदलण्याचा दृष्टीकोन तयार होतो, त्यामुळे आपल्या व्यक्तीगत व चौफेर व्यक्तीमत्वासाठी चौफेर वाचन केले पाहीजे, असे प्रतिपादन प्राचार्य रामदास थिटे यांनी केले आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील श्री संभाजीराजे विद्या संकुल येथे वाचन प्रेरणा दिना निमित्ताने विद्यार्थी मार्गदर्शन करताना प्राचार्य रामदास थिटे बोलत होते. याप्रसंगी सांस्कृतिक विभागातील प्राध्यापक महावीर भिसे, संतोष डफळ, गणेश बांगर, संतोष तांबे, जालींदर रणसिंग, प्रमोद काळे, दत्तात्रय धस, दिपक थोरात, प्राध्यापिका सुनिता उमाप, संगिता ढवळे, पल्लवी नळकांडे, शिल्पा घुले, मनिषा वाळुंज, सविता मांडवेकर, रेश्मा गहीने, प्रीती पवार, सीमा बांगर, आश्विनी खेडकर, रोहीणी जराड यांसह आदि मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विविध ग्रंथांचे प्रदर्शन, वाचन कौशल्याचे सादरीकरण, वाचन पोस्टर प्रदर्शन, वाचन कट्टा व भित्तीपत्रक प्रदर्शन आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विजय गायकवाड, प्राध्यापिका योगिता इंगळे यांनी केले होते, तर याप्रसंगी बोलताना वाचन संस्कृती निर्माण होणे ही शैक्षणिक प्रगतीची गरज असून शिक्षक ते राष्ट्रपती हा डॉ. अब्दुल कलाम यांचा प्रवास प्रत्येक क्षेत्राला प्रेरणेचा दिपस्तंभ आहे.

विद्यार्थ्यांनी नियमितपणे वर्तमानपत्र, संदर्भ ग्रंथ तसेच स्पर्धा परीक्षेशी संबधित वाचन करावे, वाचनाने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व आकारास येते असे डॉ. ललीत इंगवले यांनी सांगितले, विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने आयोजित कार्यक्रमामुळे वाचन प्रेरणा दिन उत्साहात पार पडला. तर विद्यालयाच्या या उपक्रमास संस्था अध्यक्ष सुगंधराव उमाप व सचिव प्रकाश पवार यांनी शुभेच्छा देत आयोजकांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

6 तास ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

6 तास ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

2 दिवस ago

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

2 दिवस ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

2 दिवस ago